Redmi K40 सीरीज आज होणार लाँच, 5G कनेक्टिविटीसोबत हे मिळणार फीचर्स

नवी दिल्लीः सीरीजचे स्मार्टफोन आज लाँच करण्यात येणार आहेत. कंपनी या सीरीजला सध्या चीनमध्ये लाँच करणार आहे. लाँच इव्हेंटची सुरुवात भारतीय वेळेनुसार, सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी दोन स्मार्टफोन Redmi K40 आणि लॉन्च करणार आहे. स्मार्टफोन शिवाय, कंपनी आजच्या इव्हेंटमध्ये रेडमी बुक प्रो लॅपटॉप आणि रेडमी मॅक्स टीव्ही मॉडल्स सुद्धा लाँच करू शकते. रेडमी के ४० सीरीजची सुरुवातीची किंमत २९९ युआन म्हणजेच ३३ हजार ६०० रुपये असू शकते. वाचाः रेडमी के ४० सीरीजचे खास वैशिष्ट्ये रेडमी के ४० सीरीजची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. कंपनीने या सीरीजच्या काही वैशिष्ट्याला टीज केले होते. चीनची मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट विबो च्या माहितीनुसार रेडमी के ४० सीरीजमध्ये सॅमसंगचे डेव्हलप केले आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा E4 AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. नवीन डिस्प्ले टेक्नोलॉजीच्या मदतीने युजर्संना जबरदस्त व्ह्यूइंग अँगल मिळणार आहे. वाचाः कंपनीने जो टीजर पोस्ट केला होता. त्याच्या माहितीनुसार, या सीरीजमध्ये डॉल्बी अॅटमॉस सराउंड आणि ड्यूल स्पीकर मिळणार आहे. सोबत फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,520mAh ची बॅटरी देण्यात येणार आहे. कंपनीचे जनरल मॅनेजर लू वेबिंग ने कन्फर्म केले होते की रेडमी के ४० मध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ८८८ एसओसी मिळणार आहे. रेडमी के ४० स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 870 SoC सोबत येणार आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सीरीजमधील काही सर्टिफिकेशन वेबसाइटवर पाहिले गेले होते. लिस्टिंगच्या माहितीनुसार, दोन्ही स्मार्टफोनमध्ये ५जी आणि ४ जीबी कनेक्टिविटी सोबत लाँच केले जाणार आहे. फोनच्या डिस्प्ले संबंधी कंपनीने यात ६.६७ इंचाची स्क्रीन ऑफर केली आहे. रेडमी के ४० स्मार्टफोनमध्ये ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येऊ शकते. तरे रेडमी के ४० प्रो मध्ये १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. या दोन्ही फोनमध्ये अँड्रॉयड 11 वर बेस्ड MIUI 12 किंवा MIUI 12.5 दिला जाऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aWpxWN

Comments

clue frame