Redmi 9 Power चे 6GB रॅमचे व्हेरियंट लवकरच भारतात लाँच होणार, किंमत लीक

नवी दिल्लीः Redmi 9 Power चे 6GB रॅमचे व्हेरियंट लवकरच भारतात लाँच होणार आहे. अॅमेझॉन इंडियावरून याची माहिती लीक झाली आहे. रेडमीच्या या फोनला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लाँच करण्यात आले होते. सध्या रेडमी ९ पॉवर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. वाचाः अॅमेझॉनवरील एका बॅनरवरून हे स्पष्ट झाले आहे. फोनच्या नवीन व्हेरियंटमध्ये लाँच केले जाणार आहे. बॅनरच्या माहितीनुसार, फोनला लवकरच ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. हँडसेटची किंमत लीक झाली आहे. ९१ मोबाइल्सच्या एका रिपोर्ट नुसार टिप्स्टर ईशान अग्रवाल ने दावा केला आहे की, या व्हेरियंटची किंमत भारतात १२ हजार ९९९ रुपये असणार आहे. रेडमी ९ पॉवर मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर दिला आहे. यात 6000mAh बॅटरी आहे. वाचाः ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबीच्या रेडमीच्या फोनची किंमत देशात १० हजार ९९९ रुपये आणि ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. रेडमी ९ पॉवर आता अॅमेझॉन इंडिया आणि Mi.com वर मिळते. तसेच या फोनला Mi Homes, Mi Studios और Mi Stores वरून खरेदी करता येऊ शकते. या फोनला ब्लेज़िंग ब्लू, इलेक्ट्रिक ग्रीन, फेयरी रेड आणि माइटी ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. वाचाः हा फोन 10 बेस्ड MIUI 12 वर चालतो. यात ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डॉट ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवले जाऊ शकते. रेडमी ९ पॉवर मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bmHrAW

Comments

clue frame