Moto E7 Power भारतात लाँच, किंमत ७४९९ रु.

नवी दिल्लीः मोटोरोलाने भारतात आपला बजेट सेगमेंटमधील हँडसेट लाँच केला आहे. मोटोच्या या फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ४ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत लाँच केले आहे. फोनला भारतात ८ हजार रुपयांच्या कमी किंमतीत लाँच केले आहे. मोटोच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा व्हिजन एचडी प्लस डिस्प्ले सोबत लाँच केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या फोनला पूर्णपणे भारतात बनवले आहे. वाचाः Moto E7 Power ची किंमत मोटोच्या या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हार ४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार २९९ रुपये ठेवली आहे. फोनची विक्री २६ फेब्रुवारी पासून दुपारी १२ वाजता सुरू केली जाणार आहे. ई कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि लिडिंग रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. हँडसेट्सला ब्लू आणि कोरल रेड कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचाः Moto E7 Power ची फीचर्स मोटोच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा मॅक्स व्हिजन एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी २५ प्रोसेसर दिला आहे. हँडसेटल २ जीबी रॅम आणि ४ जीबी रॅम या दोन व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. मोटोच्या या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत २ मेगापिक्सलचा मायक्रो ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरात पोर्ट्रेट मोड, पॅनारमा, फेस ब्यूटी, एचडीआर यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः मोटोच्या या स्मार्टफोन मध्ये 4G VoLTE, टाइप-सी यूएसबी चार्जर आणि IP52 रेटिंग यासारखी जबरदस्त फीचर्स दिली आहेत. हँडसेट ला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सिंगल चार्जमध्ये दोन दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. हँडसेटमध्ये सिक्योरिटी फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qzBTcD

Comments

clue frame