जगातील सर्वात मोठे Gmail, Netflix आयडी-पासवर्ड लीक, 'असे' चेक करा आपले अकाउंट

नवी दिल्लीः सध्या जगभरात डेटा लीक एक मोठी समस्या बनली आहे. आता असा दावा केला जात आहे की, इंटरनेट युजर्संच्या अकाउंट्समध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे लीक समोर आले आहे. जगभरातील जवळपास ३०० कोटी आयडी पासवर्ड लीक झाले आहे. यात Gmail शिवाय Netflix आणि Linkedin प्रोफाइलचा समावेश आहे. वाचाः जगातील सर्वात मोठे लीक The Sun च्या एका रिपोर्टनुसार, यावेळी जगातील सर्वात मोठे लीक झाले आहे. जवळपास ३०० कोटी लोकांचे पासवर्ड डेटा लीक झाला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा सिक्योरिटी लीक मानला जात आहे. Gmail, Netflix आणि Linkedin प्रोफाइलही लीक Gmail, Netflix आणि Linkedin च्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड सुद्धा लीक झाले आहेत. रिपोर्टच्या माहितीनुसार, पहिल्यांदा डेटा लीक मध्ये लोकांचा Netflix आणि Linkedin च्या प्रोफाइलचा यात समावेश आहे. वाचाः १५०० कोटी अकाउंटमध्ये ब्रीच रिपोर्टच्या माहितीनुसार, जवळपास १५०० कोटी अकाउटमध्ये ब्रीज झाले आहे. तर जवळपास ३०० कोटी लोकांचे ईमेल आयडी आणि पासवर्ड हॅक करण्यात आले आहेत. ११.७ कोटी लोकांचे Linkedin आणि Netflix प्रोफाइल लीक यावेळी जवळपास ११.७ कोटी लोकांचे Linkedin आणि Netflix अकाउंट्स हॅक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युजर्सचा डेटाला इंटरनेट वर अपलोड करण्यात आले आहे. हॅकर्स या डेटाचा वापर दुसऱ्या अकाउंटला हॅक करण्यासाठी करू शकतात. वाचाः असे चेक करा आपले अकाउंट जर तुम्हाला तुमचे अकाउंट लीक झाल्याचा संशय येत असेल तर याला चेक करता येऊ शकते. तुम्ही https://ift.tt/36NFtIm वर क्लिक करा. या साईटवर तुम्ही तुमचे ईमेल आयडी टाकून लीक ची माहिती चेक करू शकता. यासाठी साईटला ओपन करण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZAozZA

Comments

clue frame