BSNL ने लाँच केला ४७ रुपयांचा प्रीपेड प्लान, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड ने ४७ रुपयांचा नवीन फर्स्ट रिचार्ज First Recharge (FRC) लाँच केला आहे. नवीन रिचार्ज प्रीपेड सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध आहे. पहिल्यांदा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लान उपलब्ध करण्यात आला आहे. या प्लानमध्ये व्हाइस कॉलिंग, डेटा आणि एसएमएस बेनिफिट्स मिळतात. देशात बीएसएनएल कडून ऑफर करण्यात आलेला सर्वात स्वस्त अनलिमिटेड कॉम्बो प्रीपेड प्लान आहे. वाचाः बीएसएनएलचा FRC रिचार्ज प्लान एफआरसीच्या बीएसएनएल प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग बेनिफिट्स मिळतात. म्हणजेच ग्राहकांना नॅशनल रोमिंग, एसटीडी आणि लोकल कॉल फ्री मिळते. यात मुंबई , दिल्लीच्या एमटीएनएल नेटवर्कचा समावेश आहे. या रिचार्जमध्ये १४ जीबी डेटा आणि १०० एसएमएस रोज मिळते. बीएसएनएलच्या म्हणण्यानुसार, या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच ४७ रुपयात बीएसएनएल ग्राहक अनलिमिटेड कॉम्बो प्लानचा फायदा मिळतो. वाचाः बीएसएनएलच्या म्हणण्यानुसार, या प्लानमध्ये सर्व नियम व शर्थी पीव्ही १०७ रुपयांच्या प्रीमियम प्लानच्या आहेत. याचा अर्थ एफआरसी ४७ प्लानची वैधता १०० दिवसाची आहे. यानंतर ग्राहकांना बीएसएनएल सिम कार्ड अॅक्टिव ठेवण्यासाठी दुसरा रिचार्ज करावा लागणार आहे. एफआरसी ४७ प्रमोशनल प्लान आहे. जो ३१ मार्च २०२१ पर्यंत वैध आहे. वाचाः मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएनएल एफआरसी ४७ चेन्नई आणि तामिळनाडू टेलिकॉम सर्विस मध्ये नवीन युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. लवकरच याला दुसऱ्या सर्कलमध्ये लाँच केले जाऊ शकते. २० फेब्रुवारी पासून या प्लानचे फायदे दिले जात आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZBiXOR

Comments

clue frame