भारतात चीनी अॅप्सची क्रेज घसरली, अमेरिका-रशियाची जोरदार एन्ट्री

नवी दिल्लीः भारतात चीनी अॅप्सवर बंदी घातल्याचा आता परिणाम दिसू लागला आहे. देशात गेल्यावर्षी टॉप इन्स्टॉलमध्ये भारतीय अॅपचे इन्स्टॉल व्हॅल्यूम वाढून आता ती ३९ टक्क्यांवर पोहोचली आहे. २०१८ मध्ये जवळपास ३७ टक्के होती. तर चिनी अॅप्सची इन्स्टॉल व्हॅल्यूम ३८ टक्के होती. २०२० मध्ये कमी होऊन ती २९ टक्क्यांवर आली आहे. अॅनालिटिक्स फर्म अॅप्सफ्लायरच्या रिपोर्टवरून ही माहिती समोर आली आहे. अॅप्सफ्लायर इंडियाचे कंट्री मॅनेजर संजय त्रिशालच्या माहितीनुसार, बंदी घातलेल्या चिनी अॅप कंपन्यांचे मार्केट कमी झाले आहे. भारतीय कंपन्यांना मात्र अच्छे दिन येत आहेत. वाचाः ८५ टक्के अॅप इंस्टॉलेशन टियर २ आणि टियर ३ शहरात रिपोर्टच्या माहितीनुसार, चीनला झालेल्या नुकसानानंतर इस्रायल, अमेरिका, रशिया आणि जर्मनीच्या अॅप्सने बाजारात आपली पकड बनवली आहे. या देशाने भारतातील वाढवत अॅपची क्रेझ वाढत आहे. भारतात अॅप इंस्टॉलचे जवळपास ८५ टक्के टियर २ आणि टियर ३ शहरातून येते आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अॅपमध्ये प्रादेशिक कंटेट टाकून झाल्यानंतर युजरच्या अॅप बनवण्याची शक्यता वाढली आहे. अॅप्सफ्लायरच्या एका रिपोर्ट नुसार, छोट्या शहरात आणि खेड्या पाड्यातून अॅप इंस्टॉल केले जात आहे. गेमिंग आणि फायनान्स तसेच मनोरंजन कॅटेगरीची चलती आहे. वाचाः ओटीटी स्ट्रिमिंग अॅपमुळे व्हिडिओ पाहण्याची संख्या जास्त वाढली आहे. करोना असल्यामुळे डिजिटल पेमेंट आणि फायनान्शियल अॅप डाउनलोड करण्यासाठी आणि त्याचा उपयोग करण्यासाठी वाढवला आहे. लोकांची फोनवर जास्त वेळ घालवण्याची सवय वाढली आहे. एक अॅप्सवर अवलंबून राहते. युजर्स आपल्याकडील फोनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतीय अॅप्स युजर्सं या अॅप्सला पसंत केले जात आहे. ज्या अॅपला कमी डेटा लागतो तसेच खराब नेटवर्कच्या क्षेत्रात चांगले नेटवर्क मिळत असल्याने युजर्संची संख्या वाढली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sa3yRX

Comments

clue frame