क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव, सोशल मीडियावर 'असा' उडतोय धुरळा

नवी दिल्लीः गुजरातमधील अहमदाबाद येथील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. आतापर्यंत सरदार पटेल किंवा मोटेरा स्टेडियम नावाने हे ओळखले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या स्टेडियमला नाव देताच सोशल मीडियावर धुरळा उडाला आहे. भाजप आणि सरकारचे समर्थक यांनी या स्टेडियमला मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे, असे सांगून त्याचे समर्थन केले आहे. तर काँग्रेस आणि भाजपा विरोधकांनी सोशल मीडियावर याला आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव या स्टेडियमला देणे म्हणजे सरदार पटेल यांचा अपमान आहे, असे काहींनी सोशल मीडियावर म्हटले आहे. तर काहींनी ट्विटरवर नेहरू पासून राजीव गांधी पर्यंत यांच्या नावावर असलेल्या स्टेडियम, एअरपोर्ट आणि खेळ पुरस्कारांच्या नावाची यादीच सोशल मीडियावर झळकवली आहे. अनेकांनी याचे मीम्स तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. काँग्रेस पार्टीसाठी सोशल मीडियावर राष्ट्रीय को ऑर्डिनेटर असलेल्या गौरव पांधी यांनी लिहिले की, सरदार पटेल एअरपोर्ट आता अदानी एअरपोर्ट, सरदार पटेल स्टेडियम आता नरेंद्र मोदी स्टेडियम. पुढे काय असणार आहे. गुजरातचे नाव बदलणार? वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NswYfq

Comments

clue frame