बॉशचा भारतात डिजिटल धोरणाला वेग; या शहरात युरोपबाहेरील सर्वात मोठे केंद्र बनवणार

बेंगळूरू: बॉश या टेक्नोलॉजी आणि सेवा क्षेत्रातील आघाडीच्या पुरवठादार कंपनीने भारतीय बाजारपेठेतील डिजिटल धोरणांना चालना देण्यासाठी स्मार्ट पर्याय मोबिलिटी क्षेत्राव्यतिरिक्तही पर्याय उपलब्ध केले आहेत. बेंगळुरुमधील आपल्या अदुगोदी येथील केंद्राला स्मार्ट कॅम्पस बनवण्यासाठी बॉश इंडियाने सुमारे ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिजिटल वापराचे प्रदर्शन करणारे हे युरोपबाहेरील त्यांचे सर्वात मोठे केंद्र असणार आहे. वाचाः भारतात बॉशचे ३१५०० हून अधिक असोसिएट्स आहेत. तर, सात केंद्रांमध्ये १८००० इंजिनीअर्स जर्मनीबाहेर बॉशच्या सर्वात मोठ्या आर अॅण्ड डी मनुष्यबळाचे प्रतिनिधीत्व करतात. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत 'न्यू नॉर्मल'मध्ये भविष्यकालीन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अनेक शहरे आणि कंपन्यांनी गुंतवणुकीवर भर दिला आहे. बॉशच्या कनेक्टेड बिल्डिंग पर्यायांमध्ये निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या इमारतींमधील जवळपास प्रत्येक भागासाठी पर्याय आहे. बॉशच्या बांधकाम तंत्रज्ञानाला आयओटी पर्यायांची जोड देण्यात आल्याने सुरक्षितता, सुरक्षा, ऊर्जा वापर, कम्युनिकेशन आणि अगदी व्हिडीओवर आधारित फायर डिटेक्शन सुविधा असे एकात्मिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. वाचाः बॉशने बीकनेक्टेड हे नवे क्यूआरकोड स्कॅनिंग तंत्रज्ञान सादर केले आहे. यात वापरकर्त्याला उत्पादनाच्या खरेदीची वेळ, अतिरिक्त वॉरंटीसारखे इतर लाभ अशी एंड-टू-एंड उत्पादनाच्या कार्यकाळाची माहिती मिळते. बॉशकडे १६०० हून अधिक आधुनिक सेमी-ऑटोमेटेड व्हिज्युअल इन्स्पेक्शन कार्यस्थळे आहेत. त्यांच्या विविध उत्पादन केंद्रांवरील या सुविधेमुळे मशिनकडून रीअल-टाईममध्ये ऑपरेटरला प्रपोझल दिले जाते. सर्व क्षेत्रांमध्ये डिजिटायझेशन अधिकाधिक सुयोग्य ठरत असताना कनेक्टेड तंत्रज्ञानच यापुढे उपयोगी ठरणार आहे. एक एआयओटी कंपनी म्हणून बॉश इंडिया वैयक्तिक स्वरुपाचे आणि परवडणाऱ्या दारातील पर्याय पुरवण्यात आघाडीची भूमिका बजावत आहे. भारतातील ९८ वर्षे आणि मेक इन इंडियाची ६८ वर्षे आमच्या सर्व नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या केंद्रस्थानी लोकलायझेशन आहे,असे बॉश ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि बॉश लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aQvGUm

Comments

clue frame