५ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 'हे' ५ स्मार्टफोन

नवी दिल्लीः स्मार्टफोन मार्केटमध्ये कंपन्यांच्या स्पर्धा वाढली आहे. कंपन्यांनी आता लो बजेट मध्ये जबरदस्त टेक्नोलॉजी सोबत लाँच केली आहे. ग्राहकांना जास्त आकर्षित करता यावे यासाठी स्मार्टफोन मेकर कंपन्या आता ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन लाँच केले आहेत. जाणून घ्या या स्मार्टफोनविषयी. वाचाः Itel A25 Pro फ्लिपकार्टवर या फोनच्या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनला ४ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. फोनमध्ये ३०२० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले आणि क्वॉड कोर प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये स्मार्ट फेस अनलॉक फीचर्स दिले आहे. वाचाः Samsung Galaxy M01 Core सॅमसंग कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या फोनला लाँच केले आहे. या फोनमध्ये ५.३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनला ब्लॅक, ब्लू आणि रेड कलरमध्ये उपलब्ध केले आहे. फोनमध्ये ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये मीडियाटेक क्वॉडकोर ६७३९ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. १ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Nokia 1 ड्यूअल सिम सपोर्टच्या नोकिया १ फोनमध्ये ४.५ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये १.१ गीगा हर्ट्ज क्वॉड कोर प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये १ जीबी रॅम प्लस ८ जीबी स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात २१५० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत ४ हजार ६७२ रुपये आहे. वाचाः Panasonic Eluga I7 या फोनमध्ये ड्यूअल सिम स्मार्टफोन आहे. अँड्रॉयड ७.० वर काम करतो. फोनमध्ये ५.४५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये एलईडी फ्लॅश आणि ऑटोफोकसचा ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते. फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत ५ हजार रुपये आहे. वाचाः Micromax Bharat 2 Plus फ्लिपकार्टवर या फोनची किंमत ४ हजार २०० रुपये आहे. १ जीबी रॅम प्लस ८ जीबी स्टोरेजच्या फोनची ही किंमत आहे. फोनमध्ये ४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात १६०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bzXuLV

Comments

clue frame