२०२० मध्ये आयफोन, सॅमसंग आणि रेडमीच्या 'या' फोनची सर्वात जास्त विक्री

नवी दिल्लीः मार्केट रिसर्च कंपनी Omida ने 2020 मध्ये सर्वात जास्त शिप झालेले स्मार्टफोन्स संबंधी एक रिपोर्ट जारी केली आहे. केवळ तीन ब्रँड्सच्या फोनला टॉप १० मध्ये लिस्ट करण्यात आले आहे. २०१९ मध्ये या तीन कंपन्यांच्या फोन्सला टॉप १० मध्ये लिस्ट करण्यात आले होते. अॅपल, सॅमसंग आणि शाओनी अशा तीन कंपन्या आहेत. वाचाः Omida कडून जारी करण्यात आलेल्या एका चार्टनुसार, आयफोन ११ स्मार्टफोनला २०२० मध्ये सर्वात जास्त शिप करण्यात आले आहे. या फोनची ६४.८ मिलियन यूनिट्स बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. आयफोन ११ चे सरासरी सेलिंग प्राइस ७५४ डॉलर राहिली. या फोनला आधीच्या व्हेरियंट म्हणजेच आयफोन एक्सआर सुद्धा २०१९ मध्ये लिस्ट करण्यात आले होते. याची एकूण ४६.३ मिलियन युनिट्स शिप करण्यात आली होती. परंतु, याचा एएसपी थोडा जास्त ७७७ डॉलर होता. वाचाः याशिवाय, २०२० मध्ये अॅपलकडून दुसऱ्या स्मार्टफोन्स, तिसरे , सातवे आणि दहावे स्थान पटकावले आहे. iPhone SE ची २४.२ मिलियन, आयफोन १२ ची २३.२ मिलियन, आयफोन १२ प्रो मॅक्सची १६.८ मिलियन आणि आयफोन १२ मिनी ची १४.८ मिलियन युनिट्स बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे. या सर्वांची सरासरी सेलिंग किंमत ४५१ डॉलर, ८९६ डॉलर, १२३२ डॉलर आणि ७९६ डॉलर होती. वाचाः आयफोन १२ मिनीची बाजारात आयफोन १२ प्रो हून जास्त युनिट्स शीप करण्यात आली आहे. आयफोन १२ची विक्री कमी असल्याची माहिती समोर आली होती. आयफोन १२ प्रो ला टॉप १० चार्टमध्ये समावेश करण्यात आले नाही. याशिवाय, सॅमसंगचे ४ स्मार्टफोन्स या लिस्टमध्ये समावेश करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाची टेक कंपनी गॅलेक्सी ए ५१, गॅलेक्सी ए २१, गॅलेक्सी ए०१ आणि गॅलेक्सी ए११ या स्मार्टफोनला अनुक्रमे चौथे, पाचवे, सहावे, आठवे स्थान मिळाले आहे. या डिव्हाइस मध्ये अनुक्रमे २३.२ मिलियन, १९.४ मिलियन आणि १६.९ मिलियन आणि १५.३ मिलियन युनिट्स बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. शाओमीच्या रेडमी नोट ९ प्रो हँडसेने ९ वे नंबर पटकावले आहे. या हँडसेटची एकूण १५ मिलियन युनिट्स बाजारात उपलब्ध करण्यात आली होती. याची सरासरी सेलिंग किंमत १६१ डॉलर होती. २०२० मध्ये सर्वात जास्त शिप झालेले स्मार्टफोन्स iPhone SE (2020) iPhone 12 Galaxy A21s Galaxy A01 iPhone 12 Pro Max Galaxy A11 iPhone 12 Mini वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aS7UY4

Comments

clue frame