स्‍मार्टफोन ब्रॅण्‍ड टेक्‍नोकडून इंडिया व्‍हर्च्‍युअल रनची घोषणा

नवी दिल्‍ली: टेक्‍नो या जागतिक प्रीमिअम स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने आज टेक्‍नो इंडिया रनच्‍या (TECNO India Run) पहिल्‍या व्‍हर्च्‍युअल पर्वाच्‍या लाँचची घोषणा केली. भारत सरकारच्‍या 'फिट इंडिया मूव्‍हमेण्‍ट'ला देखील दृढ करतो. ही व्‍हर्च्‍युअल रन १३ व १४ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्‍यात येणार आहे. वाचाः आघाडीची क्रीडा उद्योजक यूटूकॅनरनसोबत सहयोगाने आयोजित करण्‍यात आली आहे आणि या रनला भारतभरातील १०० रेस अॅम्‍बॅसडर्सचे नेतृत्‍व मिळेल. टेक्‍नो इंडिया व्‍हर्च्‍युअल रनचा ग्राहकांना त्‍यांच्‍यासाठी महत्त्वपूर्ण असलेले आरोग्‍य, फिटनेस व स्‍वास्‍थ्‍याकडे लक्ष केंद्रित करण्‍यास प्रोत्‍साहित करण्‍याचा मनसुबा आहे. गेल्‍या वर्षी लोकांनी बहुतांश वेळ घरीच व्‍यतित केला. हालचाल नाही, प्रवास नाही आणि घरातूनच काम व ऑनलाइन शिक्षणामुळे जीवनशैली बैठे काम करण्‍याची झाली. या महामारीमुळे लोक त्‍यांच्‍या आरोग्‍याकडे बारकाईने लक्ष देत आहेत आणि विविध दैनंदिन कार्यांचा सामना करताना फिटनेसला प्राधान्‍य दिले जात आहे. लोकांनी व्‍हर्च्‍युअल वर्क-आऊट्समुळे त्‍यांचे आरोग्‍य सुदृढ करण्‍यास सुरूवात केली आहे. आमचा दृढ विश्‍वास आहे की, भविष्‍यात डिजिटल व फिजिकलचे संयोजन पाहायला मिळेल, असे टेक्‍नोच्‍या या फिटनेस उपक्रमाबाबत ट्रान्झिशन इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे. वाचाः टेक्‍नो इंडिया व्‍हर्च्‍युअल रनमध्‍ये तीन विभाग असतील – २ किमी परफॉर्मन्‍स वॉक, ५ किमी स्‍पीड रन आणि १० किमी पॉवर रन. ८००० हून अधिक सहभागी या रनमध्‍ये सहभाग घेण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामुळे हा अलिकडील काळामधील सर्वात लोकप्रिय उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे. सहभागींना एक जर्सी, नेकवेअर आणि ई-सर्टिफिकेट मिळेल. ही रन फिटनेसप्रेमी, अमेचर रनर्स, प्रोफेशनल रनर्स व नवशिक्‍यांसह सर्वांसाठी खुली आहे, जे रनमध्‍ये सहभाग घेऊन शकतात. सहभागींनी १० मार्च २०२१ पर्यंत ऑनलाइन किंवा निवडक रिटेल आऊटलेट्समध्‍ये नोंदणी करावी. नोंदणी केल्‍यानंतर सहभागींना कन्‍फर्मेशन मेलसह टेक्‍नो अॅपसाठी एक लिंक मिळेल. सहभागींचे रनिंग स्‍टॅट्स 'स्‍ट्रावा' अॅपच्‍या माध्‍यमातून नोंदवण्‍यात येतील. वाचाः विभागानुसार विजेत्‍यांना मिळणारी बक्षीसे फास्‍टेट टाइम (टॉप ३): २ किमी वॉक – ३,४९९ रूपये किंमतीचा १ वायरलेस स्‍पीकर फास्‍टेट टाइम (टॉप ३): ५ किमी रन – टेक्‍नो पोवा स्‍मार्टफोन फास्‍टेट टाइम (टॉप ३): १० किमी रन – १ टेक्‍नो पोवा + ३,४९९ रूपये किंमतीचा १ वायरलेस स्‍पीकर सोशल मीडियावरील टॉप १० क्रिएटिव्‍ह प्रवेशिका - ३,४९९ रूपये किंमतीचा १ वायरलेस स्‍पीकर अर्ली बर्डस्: रेस लवकर सुरू करणारे पहिले ७ रनर्स – १,२९९ रूपये किंमतीचा १ वायरलेस स्‍पीकर वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37EV0dT

Comments

clue frame