युट्युबवर अश्लील 'प्रॅन्क'; दहावीतील टॉपरसह तिघांना अटक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अश्लील संभाषण, आक्षेपार्ह शीर्षक आणि अंगप्रदर्शन करून बनविलेले युट्युबवर अपलोड करून कोट्यवधी रुपये कमविणाऱ्या तिघांना मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या तिघांमध्ये एक २००८ मधील दहावीतील टॉपर असून, तो ९८.०५ टक्क्यांनी उत्तीर्ण झाला होता. झटपट पैसे मिळविण्यासाठी खासगी शिकवणीला येणाऱ्या मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांचे व्हिडीओ बनविले जात होते. या टोळीने सुमारे ३०० व्हिडीओ अपलोड केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे. वाचाः चॅनेल, तसेच फेसबुक पेजवरून अश्लील प्रॅन्क व्हिडीओसाठी अल्पवयीन मुलींचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी राज्य महिला आयोगाकडे आल्या. आयोगाने या तक्रारी सायबर पोलिसांकडे पाठविल्या. पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मौसमी पाटील, सहायक निरीक्षक पूनम जाधव यांच्यासह वर्षा वेताळ, विष्णू काळे, विजय जाधव, गणेश ढेरे यांच्या पथकाने युट्युबवरील या व्हिडीओंची बारकाईने पाहणी केली. मरिन ड्राइव्ह, वांद्रे फोर्ट, अक्सा, गोराई, जुहू बीच, बालाजी गार्डन यांसह इतर अनेक ठिकाणी हे व्हिडीओ चित्रित केल्याचे लक्षात आले. यामध्ये तरुणीच्या अंगाला स्पर्श करणे, अश्लील चाळे, अश्लील भाषेचा वापर करण्यात आला होता. व्हिडीओ तयार करण्यासाठी अल्पवयीन मुली आणि मुलांचाही वापर करण्यात आला होता. वाचाः सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार केले जात असल्याने सायबर पोलिसांनी यामध्ये तपास करीत व्हिडीओ बनविणाऱ्या मुकेश फुलचंद गुप्ता याच्यासह प्रिन्सकुमार राजू साव, जितेंद्र गुप्ता या तिघांना अटक केली. मुकेश गुप्ता २००८ मध्ये दहावी इयत्तेत ९८.०५ गुण मिळवून उत्तीर्ण झाला असून, सध्या खासगी शिकवणी घेतो. शिकवणीसाठी येणाऱ्या मुलांना आणि मुलींना एक ते दीड हजार रुपये देऊन त्यांच्याकडून प्रॅन्क व्हिडीओ तयार करून घेतले जातात. कुणी नकार दिल्यास वेगवेगळी कारणे सांगून त्यांना घाबरविले, तसेच धमकाविण्यात येत होते, अशी माहिती सहपोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. १७ युट्युब चॅनेल या तिघांनी प्रॅन्क व्हिडीओ अपलोड करण्यासाठी १७ युट्युब चॅनेल आणि काही फेसबुक पेज तयार केले होते. जितके जास्त लाइक्स आणि व्युव्हर मिळत तितक्या त्यांना अधिक जाहिराती मिळत होत्या. हे सर्व व्हिडीओ हटविण्यासाठी युट्युबला कळविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3b2pXuB

Comments

clue frame