Alexa सपोर्टसोबत Daiwa ने भारतात लाँच केले दोन स्मार्ट टीव्ही, पाहा किंमत

नवी दिल्लीः : भारतीय ग्राहकांसाठी Daiwa ने आपले दोन नवीन स्मार्ट टीव्ही एक ३२ इंच आणि दुसरा ३९ इंचाचा टीव्ही लाँच केले आहेत. हे टीव्ही अँड्रॉयड ८.० व्हर्जनवर काम करतात. याशिवाय, ग्राहकांना यात ए३५ क्वॉड कोर प्रोसेसर, बिल्ट इन अलेक्सा सोबत हँड फ्री एक्सपीरियन्स आणि कंटेटचे मोठे लायब्रेरी साठी द बिग वॉल यूआय उपलब्ध करण्यात आले आहे. वाचाः फीचर्स Daiwa Smart Tv मध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज दिले आहे. याशिवाय कनेक्टिविटीसाठी ३ एचडीएमआय पोर्ट आणि दोन यूएसबी पोर्ट शिवाय ऑडियो डिव्हाइस साठी ब्लूटूथ, स्क्रीन मिररिंग साठी ई-शेयर सारखे फीचर्स दिले आहेत. हे लेटेस्ट स्मार्ट टीव्ही 1366 X 768 पिक्सल रिजॉल्यूशन आणि Quantum Luminit Technology दिली आहे. टीव्ही मॉडल्समध्ये एन्हान्स्ड युजर व्ह्यूइंग एक्सपीरियन्स साठी क्रिकेट किंवा सिनेमा सारखे प्री सेट पिक्चर मोड्स दिले आहेत. ऑडियोमध्ये स्टिरियो बॉक्स स्पीकर्स मिळते. हे २० वॉट साउंड आउटपूट देते. दाईवा ब्रँडच्या या स्मार्ट टीव्हीत द बिग वॉल यूआय दिली आहे. जे २५, ००, ००० तासांहून जास्त कंटेट देते. तसेच या टीव्हीत Sony Liv, Disney+ Hotstar, Voot, Eros Now, Netflix, Amazon Prime Video आणि YouTube सारख्या अॅप्सचा सपोर्ट मिळतो. वाचाः किंमत ३२ इंचाच्या Daiwa D32S7B मॉडलची किंमत १५ हजार ९९० रुपये आहे. तर ३९ इंचाच्या D40HDRS मॉडलची किंमत २१ हजार ९९० रुपये आहे. दोन्ही मॉडल्सला भारतातील प्रमुख रिटेल स्टोर्स विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. दोन्ही टीव्हीवर एक वर्षाची कंप्लिट वॉरंटी देण्यात आली आहे. तसेच माय दाईवा अॅपवर प्रोडक्टला रजिस्टर केल्यास टीव्ही पॅनेलवर एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी मिळणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tZTYml

Comments

clue frame