ALERT! लवकर आपल्या स्मार्टफोनमधून डिलिट करा हे अॅप, फोन हॅक होऊ शकतो

नवी दिल्लीः गुगल प्ले स्टोरवर असे अनेक अॅप्स आहेत. जे युजर्संचा डेटा चोरण्याचे काम करीत आहेत. किंवा त्यांच्यासोबत फ्रॉड करण्यासाठी बसलेले आहेत. या अॅप्सला हॅकर्स किंवा स्पाय फर्मकडून ऑपरेट केले जाते. एका अॅपला पुन्हा एकदा शोधले आहे. हे अॅप युजर्संचा फोन हॅक करू शकतो. सायबर सिक्योरिटी फर्म Trend Micro ने लोकप्रिय फाइल शेयरिंग अँड्रॉयड अॅपमध्ये काही कमतरता शोधली आहे. सिक्योरिटी फर्मकडून सूचना करण्यात आली आहे की, या अॅपला शेयर करणे बंद केले पाहिजे जोपर्यंत या अॅपच्या सिक्योरिटी मुद्दा सोडवत नाही. वाचाः Trend Micro च्या रिपोर्टनुसार, या अॅपमध्ये अनेक कमतरता आहेत. यामुळे याचा दुरुपयोग करून युजर्संचा संवेदनशील डेटा लीक केला जाऊ शकतो. हे अॅप वेगवेगळ्या फाइल्सला डाउनलोड आणि ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. याला भारतात बंदी आहे. परंतु, २०१९ मध्ये सर्वात जास्त डाउनलोड करणाऱ्या अॅपपैकी एक आहे. याचा सरळ अर्थ आहे की, लाखो लोकांचा डेटा धोक्यात येऊ शकतो. वाचाः Trend Micro च्या एका सिक्योरिटी रिसर्चर ने, SHAREit मध्ये काही कमतरता असल्याचे शोधले आहे. हे युजर्संचा संवेदनशील डेटा लीक केला जाण्याची भीती आहे. Trend Micro ने याची माहिती गुगलला दिली आहे. कंपनी प्ले स्टोरवर या अॅपसंबंधी मोठे पाउल उचलू शकते. SHAREit चे १ बिलियन हून जास्त युजर्स आहे. या वर्षात सर्वात जास्त डाउनलोड केलेल्या अॅप्सपैकी एक आहे. यानंतर सरकारने नोव्हेंबर २०२० मध्ये टिकटॉक सह ५७ अन्य चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यात SHAREit चा समावेश होता. भारतीय युजर्संकडून अनइंस्टॉल करणे हे चांगले काम होऊ शकते. कारण, हॅकर्सला उघड परवानगी देण्यासारखे आहे. वाचाः Trend Micro ने म्हटले की, SHAREit ला या प्रकरणी सूचना दिली आहे. परंतु, अद्याप त्यावर त्यांची प्रतिक्रिया आलेली नाही. या रिपोर्टचा खुलासा रिसर्चच्या तीन महिन्यांनंतर आला आहे. जर तुमच्या मोबाइलमध्ये शेयरइट असेल तर तात्काळ डिलिट करणे हे फायद्याचे ठरू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37o9P4t

Comments

clue frame