8500mAh बॅटरी, 6GB RAMचा स्मार्टफोन लाँच, सिंगल चार्जवर ४ दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप

नवी दिल्लीः ला कंपनीने लेटेस्ट स्मार्टफोन म्हणून लाँच केले आहे. या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनमध्ये सर्वात मोठी बॅटरी 8500mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनीचा या बॅटरीवरून दावा आहे की, या फोनला सिंगल चार्जवर २ ते ४ दिवसापर्यंत बॅटरी बॅकअप मिळतो. तसेच कंपनीने या फोनला जबरदस्त परफॉर्मन्स सोबत फुल रग्ड डिझाइनसोबत लाँच केले आहे. याआधी कंपनीने Doogee S88 Plus आणि S96 Pro स्मार्टफोनला लाँच केले आहे. वाचाः फोनची किंमत Doogee S86 स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २१ हजार ७२२ रुपये आहे. या स्मार्टफोनला ग्राहक AliExpressवरून खरेदी करू शकतात. वाचाः फोनचे फीचर्स ड्यूअल सिम (नॅनो) Doogee S86 स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतो. या फोनमध्ये ६.१ इंचाचा कॉर्निंग गोरीला ग्लास एचडी प्लस वॉटरड्रॉप डिस्प्ले दिला आहे. हा फोन हीलियो पी ६० ऑक्टा कोर प्रोसेसर सोबत दिला आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. सोबत ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा तिसरा आणि २ मेगापिक्सलचा चौथा कॅमेरा दिला आहे. तर व्हिडिओ आणि सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः या स्मार्टफोनचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे याची दमदार बॅटरी आहे. कंपनीने Doogee S86 स्मार्टफोनमध्ये 8,500 एमएएएच बॅटरी दिली आहे. सोबत २४ वॉट टाइप सी फास्ट चार्ज सपोर्ट दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, या फोनचा सिंगल चार्जवर २ ते ४ दिवस पर्यंत वापर करू शकता येतो. तर स्टँडबाय वर हा फोन २७ दिवसापर्यंत टिकू शकतो. या फोनवरून २९ तास लागोपाठ कॉलिंग करू शकता येते. हा फोन वॉटर, ड्रॉप व डस्ट रेसिस्टेंससाठी IP68 आणि IP69K सर्टिफाइड आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aKVJMp

Comments

clue frame