7000mAh बॅटरीचा Samsung Galaxy F62 स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः सॅमसंगने अखेर सोमवारी आपला मोस्ट अवेटेड स्मार्टफोन गॅलेक्सी एफ ६२ वरून पडदा हटवला आहे. स्मार्टफोनला भारतात कंपनीने लाँच केले आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनला #FullOnSpeedy या हॅशटॅगसोबत लाँच केले आहे. या फोनमध्ये 7000mAh बॅटरी दिली आहे. तसेच सॅमसंग एक्सीनॉस ९८२५ प्रोसेसर दिला आहे. जाणून घ्या भारतात लाँच झालेल्या Samsung Galaxy F62 स्मार्टफोनसंबंधी सर्वकाही. वाचाः Samsung Galaxy F62 फोनची किंमत सॅमसंग कंपनीने या फोनला ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट अशा दोन व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. ६ जीबी रॅमच्या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅमच्या फोनची किंमत २५ हजार ९९९ रुपये आहे. फोनची विक्री सॅमसंग ऑनलाइन स्टोर, फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल आणइ काही निवडक जिओ स्टोरवर २२ फेब्रवारी रोजी दुपारी १२ वाजेपासून उपलब्ध केली जाणार आहे. वाचाः Samsung Galaxy F62 ला ICICI बँक डेबिट व क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास २ हजार ५०० रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. फोनला फ्लिपकार्ट वरून फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्रोग्राम अंतर्गत खरेदी करू शकाल. या फोनला लेजर ग्रीन, लेजर ब्लू आणि लेजर ग्रे या कलरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. वाचाः Samsung Galaxy F62 फोनची वैशिष्ट्ये Samsung Galaxy F62 या फोनमध्ये ६.७ इंचाचा सुपर अमोलेड प्लस इनफिनिटी ओ डिस्प्ले दिले आहे. फोनमध्ये कंपनीचा एक्सीनॉस 9825 प्रोसेसर दिला आहे. हँडसेटला ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. वाचाः सॅमसंगच्या या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियरवर ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Samsung Galaxy F62 स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 7000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. जी २५ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते. फोनमध्ये फिंगरप्रिट सेन्सर दिले आहे. हँडसेट अँड्रॉयड ११ बेस्ड वन यूआय ३.१ सोबत येते. स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय, एनएफसी, जीपीएस, जीपीआरएस, मायक्रो-यूएसबी यासारखे कनेक्टिविटी फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये एक्सीलेरोमीटर, जायरो सेंसर, जियोमॅग्नेटिक सेंसर, लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर दिले आहेत. फोनचे वजन २१८ ग्रॅम आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZjUrkY

Comments

clue frame