भारतात 5G सर्विससाठी Airtel 'या' अमेरिकन कंपनीची मदत घेणार

नवी दिल्लीः भारतात प्रत्येक मोबाइल आणि इंटरनेट युजर्सना सध्या एकच प्रश्न पडला आहे की, भारतात 5G Network Service कधीपर्यंत सुरूवात होणार आहे. सध्या ६० हून जास्त देशात ५ जी सर्विस सुरू आहे. तसेच चीन आणि अमेरिका सारख्या देशात आता 6G नेटवर्क सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला जात आहे. तर १.३५ अब्जच्या लोकसंख्येच्या देशात भारतात अद्याप ५ जी सर्विस सुरू करण्यात आली नाही. परंतु, सध्या भारतात यावर वेगाने प्रयत्न केले जात आहेत. वाचाः 5G Fixed Wireless Access ची गरज सध्या टेलिकॉम कंपनी एअरटेलने भारतात ५ जीची टेस्टिंग केली आहे. त्यामुळे असे म्हटले जात आहे की, सरकारकडून याला मंजुरी मिळाली आहे. ५ जी नेटवर्कची सुरुवात लवकरच केली जाणार आहे. या बाबत एअरटेल क्वॉलकॉममध्ये करार करण्यात आला आहे. एअरटेल क्वॉलकॉमच्या मदतीने भारतात ५ जी सर्विस सुरू करणार आहे. एअरटेल क्वॉलकॉमच्या Radio Access Network platformचा वापर करून लोकांना ५ जी ची सुविधा देणार आहे. तसेच यासोबतच 5G Fixed Wireless Access देण्यासाठी क्वॉलकॉम मोठी भूमिका बजावणार आहे. वाचाः चांगल्या नेटवर्कसाठी Qualcomm अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी आहे. जे टेलिकॉमचे उपकरण बनवते. क्वॉलकॉमच्या प्रोसेसरची जगभरातील स्मार्टफोन्ससाठी मागणी आहे. आता एअरटेल आणि क्वॉलकॉमची पार्टनरशीप करण्यात आली आहे. भारतातील लोकांना चांगली ५ जी सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. एअरटेल भारतात Qualcomm 5G RAN प्लॅटफॉर्मचा वापर करून RAN बेस्ड 5G नेटवर्क सुरू करणार आहे. याच्या मदतीने घरात आणि ऑफिसात हाय स्पीड ५ जी सेवा सुरू करणार आहे. वाचाः लवकरच सुरू होणार सरकारी प्रक्रिया भारतात आगामी काही दिवसांत ५ जी नेटवर्क सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. यात स्पेक्ट्रम लिलाव, लायसेन्स, आणि टेस्टिंग सह अन्य आवश्यक पूर्तता करण्यात येणार आहे. भारतात आगामी काही महिन्यात ५ जी नेटवर्क सुरू केलेले दिसणार आहे. एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया, बीएसएनएल सह अन्य टेलिकॉम कंपन्या भारतात ५ जी सर्विस सुरू करू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZIZjRa

Comments

clue frame