5000mAh बॅटरी आणि 64MP फीचर्सचा Samsung Galaxy A32 4G लाँच

नवी दिल्लीः सॅमसंगने आपली ए गॅलेक्सीचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा गॅलेक्सी ए सीरीजचा असा पहिला स्मार्टफोन आहे. ज्यात 90 Hz चे रिफ्रेश रेट दिले आहे. याआधी या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने यूरोपमध्ये या स्मार्टफोनचे 5G व्हेरियंट लाँच केले होते. सॅमसंग गॅलेक्सी A32 4G ला सॅमसंगने लाँच केले आहे. परंतु, याची किंमत आणि उपलब्धता संबंधी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. वाचाः Samsung Galaxy A32 4G फीचर या फोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड इनफिनिटी यू नॉच डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आणि हे फुल एचडी+ रेजॉलूशन सोबत येते. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरच्या या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. वाचाः फोनला ४ जीबी, ६ जीबी आणि ८ जीबी रॅम तसेच ६४ जीबी आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शन सोबत येते. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने या फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. फोनच्या प्रोसेसर संबंधी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८५ प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. फोनला ऑसम ब्लॅक, ऑसम व्हाइट, ऑसम ब्लू आणि ऑसम वॉयलेट मध्ये उपलब्ध केले जाणार आहे. वाचाः गॅलेक्सी A32 4G आणि 5G व्हेरियंट मध्ये येते. फोनच्या दोन्ही व्हेरियंटमध्ये खूप फरक आहे. ५ जी व्हेरियंटमध्ये ४जीच्या तुलनेत मोठी स्क्रीन आहे. ५जी व्हेरियंटची डिस्प्ले साइज ६.५ इंच आहे. तर ४जी व्हेरियंटची साइज ६.४ इंच आहे. तसेच ४ जी व्हेरियंटमध्ये 90Hz रिफ्रेश रेट दिला आहे जो 5G वेरियंट मध्ये 60Hz दिला आहे. ५जी व्हेरियंटमध्ये कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर ४ जी व्हेरियंटमध्ये ६४ मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेऱ्यात ५जी व्हेरियंटमध्ये १३ मेगापिक्सलचा आणि ४ जी व्हेरियंटमध्ये २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3knJ6u7

Comments

clue frame