'असे' पाहा दुसऱ्यांचे Whatsapp स्टेट्स, 'Seen' मध्ये तुमचे नाव येणार नाही

नवी दिल्लीः टेक्नोलॉजीच्या जमान्यात आता सर्वकाही शक्य आहे. एक वेळ अशी होती की, फोनमधून एसएमएस करण्याची सुविधा होती. एका एसएमएससाठी तीन रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत होते. परंतु, आता दिवसभरात व्हॉट्सअॅपवर दिवस-रात्र चॅटिंग करता येऊ शकते. २०१८ मध्ये व्हॉट्सअॅपने स्टेट्स फीचर आणल्यामुळे अनेक जण आपल्या भावना या स्टेट्सच्या माध्यमातून व्यक्त करीत आहेत. या स्टेट्स मध्ये युजर्स फोटो किंवा व्हिडिओ स्टेट्स ठेऊ शकतात. तुम्हाला जर कुणाचे स्टेट्स पाहायले असेल आणि त्या व्यक्तीला तुमचे नाव समजू द्यायचे नसेल तर ही पद्धत वापरा. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः एकदा स्टेट्स लावल्यानंतर हे २४ तासांसाठी दिसते. त्यानंतर ते आपोआप बाद होते. व्हॉट्सअॅपच्या या फीचरला कोणी-कोणी पाहिले हे त्या युजर्संला सीनमध्ये दिसते. परंतु, आम्ही तुम्हाला याच्या उलट माहिती देणार आहोत. जर तुम्ही एखाद्याचे व्हॉट्सअॅप पाहिले तरी त्या व्यक्तीला माहिती पडणार नाही. जर तुम्ही कुणाचे व्हॉट्सअॅपचे स्टेट्स पाहिल्यास तुमचे नाव सीन मध्ये दिसणार नाही. या पद्धतीने तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कोणत्याही युजरचा लपून छपून स्टेट्स पाहू शकतात. तसेच त्या व्यक्तीला माहिती पडू सुद्धा शकणार नाही. वाचाः सर्वात आधी अँड्रॉयड किंवा आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करा. त्यानंतर अकाउंटला ओपन करा. आता प्रायव्हसी वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला रीड रिसिप्टचे एक ऑप्शन दिसेल. आता या ऑप्शनला डिसेबल करा. वाचाः या ऑप्शनला डिसेबल केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपमध्ये ब्लू टिकचे ऑप्शन बंद होईल. या ऑप्शन बंद झाल्यानंतर तुम्हाला कोणताही मेसेज आला असेल तर तुम्हाला माहिती होईल परंतु, तुम्ही तो मेसेज वाचला की नाही, हे समोरच्या व्यक्तीला माहिती पडणार नाही. याचाच अर्थ तुम्ही कुणाचेही मेसेज वाचू शकता पण त्याला कळणार नाही की, तुम्ही त्याचे मेसेज वाचले की नाही. याच पद्धतीने या ऑप्शनला डिसेबल केल्यानंतर युजर्सचे स्टेट्स पाहिल्यानंतर त्यांना समजणार नाही की, तुम्ही त्यांचे स्टेट्स पाहिले की नाही. तसेच तुमचे नाव सुद्धा सीन लिस्टमध्ये दिसणार नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38R1GXm

Comments

clue frame