नवी दिल्लीः विवोचा नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन Vivo X60 Pro+ लाँच करण्यात आला आहे. हा विवोचा २०२१ मधील पहिला फ्लॅगशीप स्मार्टफोन आहे. Vivo X60 Pro+ या फोनमध्ये क्वॉलकॉचे स्नॅपड्रॅगन ८८८ ५जी प्रोसेसर देण्यात आला आहे. Vivo X60 Pro+, विवो X60 सीरीजचा हा तिसरा स्मार्टफोन आहे. याआधी विवोने Vivo X60 आणि हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. वाचाः Vivo X60 Pro+ चे वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.५६ इंचाची फुल एचडी प्लस ई३ अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ ५जी प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी अड्रेनो ६६० जीपीयू दिला आहे. विवोच्या या फोनला पॉवर देण्यासाठी यात ४२०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ५५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देते. या फोनमध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, हाय फाय ऑडियो, टाईप सी पोर्ट आणि ५ जी सपोर्ट दिले आहे. वाचाः या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा सॅमसंग जीएन१ प्रायमरी सेन्सर दिला आहे. दुसरे लेन्स ४८ मेगापिक्सलचा दिला आहे. तसेच तिसरा लेन्स ३२ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट सेन्सर दिला आहे. चौथा लेन्स ८ मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये ५ एक्स ऑक्टिकल झूम, ६० एक्स डिजिटल झूम मिळतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः फोनची किंमत विवोच्या या फोनला सध्या चीनमध्ये लाँच केले आहे. भारतासह अन्य देशात या फोनला लवकरच लाँच करण्यात येणार आहे. विवो Vivo X60 Pro+ ला दो कलर मध्ये डीप ब्लू आणि क्लासिक ऑरेंज मध्ये लाँच केले आहे. फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले असून याची किंमत ४९९८ चिनी युआन म्हणजेच जवळपास ५६ हजार ५०० रुपये आहे. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ५९९८ युआन म्हणजेच ६७ हजार ५०० रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KBSBs0
Comments
Post a Comment