कंपनीकडून कन्फर्म, Vivo X60 Pro+ स्मार्टफोन २१ जानेवारीला होणार लाँच

नवी दिल्लीः Pro+ स्मार्टफोन लाँचिंगची फार उत्सूकता लागून राहिली आहे. परंतु, आता ती लवकरच संपणार असे दिसते. हा फोन येत्या २१ जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने स्वतः चीनी मायक्रो ब्लॉगिंग साइटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. Vivo X60 सीरीजचे दोन फोन Vivo X60 आणि ला गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. Vivo X60 Pro+ या सीरीजचा तिसरा आणि न्यू प्रीमियम फोन असणार आहे. ज्याला २१ जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. वाचाः Vivo ने आपल्या चीनी मायक्रो ब्लॉगिंग साइट विबोच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे की, Vivo X60 Pro+ स्मार्टफोनला २१ जानेवारी रोजी चीनमध्ये सायंकाळी साडे सातच्या सुमारास लाँच करण्यात येणार आहे. याची सर्वात आधी माहिती Gizmochina द्वारा सार्वजनिक करण्यात आली आहे. Vivo X60 सीरीज़चे बाकीचे दोन Vivo X60 आणि फोन Samsung Exynos 1080 प्रोसेसर सोबत लाँच करण्यात आले होते. परंतु, विवो एक्स ६० प्रो प्लसला सोडून म्हटले जात आहे की या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर सोबत येणार आहे. वाचाः हा फोन चीनच्या JD.com वेबसाइटवर सुद्धा लिस्ट करण्यात आलेला आहे. या ठिकाणी याचे कलर आणि ऑप्सन दोन कॉन्फिग्रेशनची माहिती समोर आली आहे. लिस्टिंगच्या माहितीनुसार, या फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज मिळणार आहे. तर कलर ऑप्शनमध्ये डी ऑशन ब्लू आणि क्लासिक ऑरेंजचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35IqZsq

Comments

clue frame