नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी (Vi) युजर्संसाठी अनेक जबरदस्त प्लान ऑफर करीत आहे. कंपनीकडे असे अनेक प्लान आहेत ज्यात ५ जीबी पर्यंत एक्स्ट्रा डेटा सोबत डबल डेटा आणि विकली डेटा रोलओवर बेनिफिट ऑफर केले जात आहे. जाणून घ्या वोडाफोन आयडियाच्या या प्लानविषयी. वाचाः या प्लानमध्ये मिळणार ५ जीबी पर्यंत एक्स्ट्रा डेटा युजर्संना सध्या जास्त डेटा देणारे प्लान पसंत पडतात. त्यामुळे वोडाफोन आयडिया कंपनीने बेस्ट डेटा बेनिफिट प्लान देत आहे. कंपनी आपल्या १४९ रुपये, २१९ रुपये, २४९ रुपये, ३९९ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये फ्री अतिरिक्त डेटा ऑफर करीत आहे. १४९ रुपयांच्या प्लानमध्ये १ जीबी, २१९ रुपयांच्या प्लानमध्ये २ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. तर तुम्हाला ५ जीबी एक्स्ट्रा हवा असेल तर २४९ रुपये, ३९९ रुपये, ५९९ रुपयांचे प्लान रिचार्ज करावे लागतील. वाचाः या प्लानमध्ये मिळणार डबल डेटाचा फायदा वोडाफोन आयडिया युजर्संना काही डबल डेटा बेनिफिट प्लान ऑफर केले जातात. कंपनीने आपला डबल डेटा ऑफरला जून २०२० मध्ये लाँच केले होते. डबल डेटा ऑफर प्लानमध्ये कंपनी रोज २ जीबी डेटा सोबत २ जीबी एक्स्ट्रा डेटा देत आहे. ही ऑफर कंपनीच्या २९९ रुपये, ४४९ रुपये, आणि ६९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानवर उपलब्ध आहे. २८, ५६, आणि ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएसचा फायदा मिळतो. वाचाः विकेंड डेटा रोलओवरचे प्लान कंपनीने विकेंड डेटा रोलओवर बेनिफिटची सुरुवात ऑक्टोबर २०२० मध्ये केली होती. ज्या प्लानमध्ये विकेंड डेटा रोल ओवर बेनिफिट दिले जात आहे. त्यात २४९ रुपये, २९७ रुपये, २९९ रुपये, ३९८ रुपये, ३९९ रुपये, ४४९ रुपये, ४९७ रुपये, ४९९ रुपये, ५५५ रुपये, ५५८ रुपये, ५९९ रुपये, ६४७ रुपये, ६९९ रुपये, ७९५ रुपये, ८१९ रुपये, ११९७ रुपये, २३९९ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39ZFwRV
Comments
Post a Comment