VI च्या 'या' रिचार्ज प्लानसमोर जिओ आणि एअरटेल फेल

नवी दिल्लीः Vodafone Idea चे देशात अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लान आहेत. वोडाफोन-आयडियाचा ४४९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान संबंधी ही खास माहिती देत आहोत. या प्लानच्या तुलनेत दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांचे प्लान कसे आहेत. या प्लानमध्ये काय काय मिळते, याची सविस्तर माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः वोडाफोन-आयडियाचा ४४९ रुपयांचा प्लान या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये रोज ४ जीबी डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, रोज १०० एसएमएस मिळतात. तसेच यात झी ५ अॅप आणि वोडाफोन प्ले चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओचा ४४४ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. एकूण डेटा ११२ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता सुद्धा ५६ दिवसांची आहे. तसेच अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मिळतात. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः एअरटेलचा ४४९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता सुद्धा ५६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मिळतात. या प्लानमध्ये अॅमेझॉन प्राईमचे ३० दिवसांसाठी मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, फ्री हेलोट्यून्स, एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम, विंक म्यूझिक फ्री, फ्री ऑनलाइन कोर्स, तसेच फास्टॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. वाचाः या तिन्ही रिचार्ज प्लानची तुलना केल्यास या तिन्ही कंपन्यांच्या प्लानची किंमत जवळपास सारखीच आहे. परंतु, यात वोडाफोन-आयडियाच्या प्लानमध्ये रोज ४ जीबी डेटा मिळतो. तर जिओ आणि एअरटेलच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3o3Kmms

Comments

clue frame