Samsung Galaxy F62 सोबत तीन नवीन फोन लवकरच होणार लाँच

नवी दिल्लीः सॅमसंग २ फेब्रुवारी रोजी भारतात आपले नवीन स्मार्टफोन Galaxy M02 लाँच करणार आहे. तसेच कंपनी फेब्रुवारीत वेगवेगळ्या मार्केटमध्ये आणखी चार नवीन फोन लाँच करण्याची शक्यता आहे. लाँच करण्यात येणाऱ्या फोनमध्ये Galaxy F62, Galaxy F12, Galaxy A72 आणि Galaxy A52 5G या स्मार्टफोन्सचा समावेश असू शकतो. वाचाः लाइव्ह झाला गॅलेक्सी F62 चा सपोर्ट पेज गॅलेक्सी F62 चे सपोर्ट पेज डिसेंबर २०२० मध्ये सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर लाइव्ह झाले आहेत. आता कंपनी गॅलेक्सी F62 चे सपोर्ट पेज लाइव केले आहे. या फोनचे मॉडल नंबर (SM-E625F/DS) आहे. सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एफ सीरीजला गेल्या वर्षी लाँच केले होते. या सीरीजचा पहिला स्मार्टफोन गॅलेक्सी F41 आहे. वाचाः फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव असणार फोन गॅलेक्सी F41 प्रमाणे गॅलेक्सी F12 आणि गॅलेक्सी F62 सुद्धा फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव फोन असणार आहे. त्यामुळे गॅलेक्सी F12 शी मिळता जुळता व्हेरियंट म्हणजेच गॅलेक्सी एम १२ अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. वाचाः गॅलेक्सी ए सीरीजचे दोन फोन सपोर्ट पेज लाइव्ह गॅलेक्सी एफ सीरीज शिवाय ए सीरीजचे दोन अपकमिंग फोनला सपोर्ट पेजवर पाहिले गेले आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला सॅमसंगच्या रशिया वेबसाइटवर गॅलेक्सी A72 4G ला पाहिले गेले आहे. याशिवाय सॅमसंग गॅलेक्सी A52 4G सपोर्ट पेजला ऑस्ट्रियाच्या सॅमसंग वेबसाइटवर पाहिले गेले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने Galaxy S21 सीरीजच्या फ्लॅगशीप स्मार्टफोन्सला लाँच केले होते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36qTw6q

Comments

clue frame