बजेट स्मार्टफोन Realme C20 लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः हँडसेट निर्माता कंपनी रियलमीने आपला लेटेस्ट एन्ट्री लेवल स्मार्टफोन ला लाँच केले आहे. बजेट स्मार्टफोनला कमी किंमतीत लाँच केले आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 5000 mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. वाचाः Realme C20 ची वैशिष्ट्ये रियलमी सी स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारित रियलमी यूआय वर काम करतो. रियलमी फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस (720x1,600 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०.९ इतका आहे. वाचाः रॅम स्टोरेज आणि प्रोसेसर स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर सोबत २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. वाचाः डिझाइन आणि कॅमेरा रियलमीच्या या फोनमध्ये फ्रंट पॅनलवर वॉटरड्रॉप स्टाइल डिस्प्ले नॉच दिला आहे. खालील बाजुस बॉर्डरला पाहायला मिळू शकतो. रियलमी सी २० स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि फ्लॅश दिला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. वाचाः बॅटरी क्षमता आणि कनेक्टिविटी या फोनला पॉवर देण्यासाठी यात ५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. याशिवाय या फोनमध्ये ३.५ मिलीमीटर हेडफोन जॅक, ब्लूटूथ व्हर्जन ५.०, ड्यूल बँड वाय फाय, जीपीएस आणि मायक्रो यूएसबी पोर्ट दिले आहे. फोनच्या मागच्या बाजुला सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. वाचाः फोनची किंमत रियलमीच्या या फोनला दोन कलर व्हेरियंटमध्ये उतरवले आहे. सध्या या फोनला व्हिएतनाममध्ये लाँच केले आहे. तसेच या स्मार्टफोनची किंमत ७ हजार ८०० रुपये आहे. ग्लोबल मार्केटमध्ये या फोनला लाँच करणार की नाही, हे कंपनीने अद्याप स्पष्ट केले नाही. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iDzdHK

Comments

clue frame