नवी दिल्लीः गेमिंगच्या जगात एक वेगळेच स्थान निर्माण करणारा गेम पबजी भारतात पुन्हा एकदा सुरू होणार आहे. पबजी इंडिया मोबाइल भारतात पुन्हा एकदा एन्ट्री करणार असल्याची अफवा आहे. काही मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, पबजी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रिलाँच केला जाऊ शकतो. तर काही मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, मार्च आधी भारतात पबजी येण्याची शक्यता कमी आहे. वाचाः PUBG ची मूळ कंपनी Krafton Inc ने डिसेंबर २०२० मध्ये दोन मोठ्या घोषणा केल्या होत्या. यामुळे पबजी इंडियाला पसंत करणाऱ्यांत फार मोठा उत्साह पाहायला मिळाला होता. भारतासाठी क्राफ्टन इंकचे अनीश अरविंद यांना नवीन कंट्री मॅनेजर बनवले होते. क्राफ्टन इंकने ४ अन्य लोकांना आपल्या लोकांना यात घेतले होते. पबजी मोबाइलच्या ग्लोबल व्हर्जनची कंपनी Tencent चा भाग होती. वाचाः भारतात केंद्र सरकारने २ डिसेंबर २०२० रोजी ११८ हून जास्त चायनीज मोबाइल अॅप्सवर बंदी घातली होती. यात पबजीचा सुद्धा समावेश होता. या दरम्यान, पबजीवर बंदी घातल्यानंतर भारतात (फियरलेस आणि यूनाइटेड गार्ड्स) ची एंट्री झाली आहे. या गेमला डिसेंबर २०२० मध्ये लाँच करण्यात येणार होते. परंतु, आता या गेमला २६ जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने ३ जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर FAU-G एंथम ला प्री-रजिस्ट्रेशन लिंक शेयर केले होते. आता जानेवारीत जर पबजी रिलाँच करण्यात आला तर पबजी विरुद्ध FAU-G असा सामना पाहायला मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LYLwSK
Comments
Post a Comment