स्वस्त किंमतीत 'पॉवरफुल' बॅटरीचा पोकोचा नवा स्मार्टफोन Poco M3 लाँच

नवी दिल्लीः प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड पोकोने बजेट सेगमेंट स्मार्टफोनचा विस्तार करताना नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. यात जास्त पॉवरफुल प्रोसेसर, जास्त पॉवर बॅटरीचा तसेच ट्रिपल रियर कॅमेरा असलेला फोन लाँच करण्यात आला आहे. Poco M3 ला दोन व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. याची सुरुवातीचा व्हेरियंट 4GB RAM + 64GB स्टोरेजच्या फोनची किंमत १३६ डॉलर म्हणजेच ९ हजार ९२६ रुपये तर 6GB RAM + 128GB स्टोरेज ची किंमत ११ हजार ९७० रुपये आहे. वाचाः पोकोने या फोनला गेल्या वर्षी चीनमध्ये लाँच केले होते. आता या फोनला इंडोनेशियात लाँच केले आहे. पुढील महिन्यात या फोनला भारतात लाँच करण्यात येणार आहे. जर तुम्हला पोकोचा स्मार्टफोन्स खरेदी करायचा असेल तर सध्या Flipkart Big Saving Days Sale 2021 सुरू आहे. या सेलमध्ये Poco X3, Poco M2 Pro, Poco C3 आणि Poco M2 स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो. वाचाः Poco M3 चे खास वैशिष्ट्ये पोकोच्या बजेट स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनचा स्क्रीन रिझॉल्यूशन 1080x2340 पिक्सल आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉ स्नॅपड्रॅगन ६६२ एसओसी प्रोसेसर सोबत लाँच करण्यात आले आहे. पोकोच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच २-२ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि मायक्रो लेन्स दिला आहे. पोकोच्या या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. पोको एम २ चा हा फोन सक्सेसर मानला जात आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात 6,000mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bZNVHE

Comments

clue frame