OPPO A93 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि ९० हर्ट्ज डिस्प्ले, पाहा किंमत

नवी दिल्लीः Qualcomm ने नुकतेच आपले बजेट मधील ५जी फोन्ससाठी स्नॅपड्रॅगन 480 5G मोबाइल प्रोसेसर लॉन्च केले आहे. कंपनीने खुलासा केला आहे की, विवो, ओप्पो, शाओमी सह अनेक स्मार्टफोन ब्रँड्स २०२१ च्या पहिल्या तिमाहित स्नॅपड्रॅगन ४८० प्रोसेसरचे फोन्स लाँच करणार आहे. गेल्या आठवड्यात विवोने Y31s 5G स्मार्टफोन्स लाँच केला आहे. ज्यात स्नॅपड्रॅगन ४८० प्रोसेसरचा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. आता ओप्पो ने सुद्धा या चिपसेट सोबत वरून पडदा हटवला आहे. वाचाः OPPO A93 5G ची किंमत ८ जीबी रॅम व २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या या फोनची किंमी १९९९ चिनी युआन म्हणजेच २२ हजार ५०० रुपये आहे. परंतु, १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत अद्याप उघड करण्यात आली नाही. फोन एलिगेंट सिल्वर, डेजल ब्लॅक, आणि ऑरोरा कलरमध्ये मिळणार आहे. सध्या या फोनला दुसऱ्या मार्केटमध्ये लाँच करण्यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. वाचाः फोनची फीचर्स ओप्पोच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुलएचडी+ LTPS LCD डिस्प्ले पॅनल आहे. स्क्रीनवर पंच होल डिझाईन आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २०.९ पिक्सल डेनिसिटी ४०५ पीपीआय आणि रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते. ओप्पोच्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्सचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे . १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38IYNb1

Comments

clue frame