गुड न्यूज! सर्वात स्वस्त ५जी मोबाइल Moto G 5G च्या किंमतीत मोठी कपात

नवी दिल्लीः स्वस्त किंमतीतील ५ जी स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात स्वस्त ५ जी मोबाइल Motorola च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. गेल्यावर्षी मोटोरोला मोटो ५जी ला भारतात २० हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. आता एक महिन्यानंतर या फोनच्या किंमतीत २ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन आता १८ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकतो. वाचाः या महिन्यात २० जानेवारी पासून Flipkart Big Saving Days Sale सुरू होत आहे. यात मोटोरोलाच्या या फोनला एचडीएफसी बँक कार्डवरून फोन खरेदी केल्यास १० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. वााचाः डिस्प्ले आणि बॅटरी Motorola Moto G 5G च्या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा LTPS IPS LCD डिस्प्ले दिला आहे. याचे स्क्रीन रिझॉल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. अँड्रॉयड १० वर आधारित असलेला हा फोन ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज सोबत लाँच केला आहे. मोटोरोलाचा हा स्वस्त ५जी मोबाइलमध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः कॅमेरा भारतात Volcanic Gray आणि Frosted Silver कलर ऑप्शन मध्ये लॉन्च Moto G 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात प्रायमरी सेन्सर ४८ मेगापिक्सलचा आहे. यासोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. मोटो ५जी मध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनच्या मदतीने ४के व्हिडिओ शूट करू शकतो. या फोनमध्ये अनेक जबरदस्त वैशिष्ट्ये आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LudZ36

Comments

clue frame