LG K42 क्वॉड कॅमेरा सेटअप सोबत भारतात लाँच, किंमत १० हजार ९९० रुपये

नवी दिल्लीः ला भारतात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि ४००० एमएएच क्षमतेच्या बॅटरी सोबत लाँच केले आहे. तसेच नवीन एलजी फोन मिलिट्री-ग्रेड MIL-STD-810G सर्टिफाइड बिल्ड सोबत येतो. या फोनमध्ये ९ वेगवेगळ्या कॅटेगरीत यूएस मिलिट्री टेस्टिंग पास केली आहे. यात हाय लो टेम्परेचर, शॉक, व्हायब्रेशन, टेम्परेचर शॉक आणि ह्यूमिडिटी याचा समावेश आहे. वाचाः LG K42 ची किंमत भारतात ३ जीबी प्लस ६३ जीबी व्हेरियंटसाठी १० हजार ९९० रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना यात एक्सक्लूसिव्ह म्हणून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येऊ शकते. हा फोन ग्रे आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये येणार आहे. तसेच ग्राहकांना या फोनसोबत दोन वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी आणि एक वर्षासाठी फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट मिळणार आहे. वाचाः या फोनमध्ये ड्यूल सिम (नॅनो) सपोर्ट मिळणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० बेस्ड एलजी यूएक्सवर काम करतो. या फोनमध्ये ६.६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅमसोबत ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो पी २२ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियरमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये आणखी काही जबरदस्त फंक्शन दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NzJsS3

Comments

clue frame