JBL C115 TWS ईयरबड्स भारतात लाँच, मिळणार २१ तासांची बॅटरी लाइफ

नवी दिल्लीः ट्रूली वायरलेस ईयरबड्सला भारतात लाँच करण्यात आले आहे. या ईयरबड्समध्ये इन ईयर डिझाइन दिली आहे. तसेच याला स्लीक चार्जिंग केसमध्ये बाजारात उतरवले आहे. या डिव्हाइसमधील सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे युजर्संना या केससोबत एकूण २१ तासांची बॅटरी लाइफ मिळणार आहे. तसेच यात फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. वाचाः नवीन ईयरबड्सची किंमत ४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या ऑडियोला ग्राहक अॅमेझॉन इंडियावरून खरेदी करू शकतात. ग्राहक याला ब्लॅक, मिंट, रेड आणि व्हाइट कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकतात. या बड्स सोबत नो कॉस्ट ईएमआय, अॅमेझॉन पे लेटर कॅशबॅक आणि १ वर्षाचे हंगामा म्यूझिक सब्सक्रिप्शन यासारखे ऑफर्स दिले जात आहेत. या बड्समध्ये ब्लूटूथ ५.० सपोर्ट सोबत ५.८ एमएम ड्रायव्हर्स दिले आहे. म्यूझिक आणि कॉलिंग साठी याचा वापर मोनो किंवा स्टिरियो दोन्ही मोड्समध्ये केला जाऊ शकतो. या इन ईयर डिझाइनच्या बड्समध्ये ग्राहकांना बॉक्समध्ये तीन साइजचे ईयर टिप्स मिळतील. वाचाः जेबीएलच्या नवीन ईयबड्समध्ये ६ तासांची बॅटरी लाइफ मिळणार आहे. तसेच केससोबत १५ तासांची अतिरिक्त बॅटरी युजर्संना मिळणार आहे. म्हणजेच युजर्संना एकूण २१ तासांची बॅटरी लाइफ मिळणार आहे. या बड्समध्ये हँड्स फ्री कॉलिंग, व्हाइस असिस्टेंट आणि म्यूझिक चेंज करण्यासाठी टच कंट्रोल्स दिले आहेत. हे बड्स गुगल असिस्टेंट आणि अॅमेझॉन अलेक्सा दोन्हीचा सपोर्ट करतात. यात साउंड अडवान्स्ड करण्यासाठी जीबीएल प्योर बेसचा सपोर्ट मिळणार आहे. बॉक्समध्ये ग्राहकांना यूएसबी टाइप सी चार्जिंग केबल मिळणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3o4OqT9

Comments

clue frame