iPhone 12 नंतर आता iPhone 13 Series ची उत्सूकता, पाहा कधी होणार लाँच

नवी दिल्लीः जगातील सर्वात प्रसिद्ध टेक कंपनी पैकी एक असलेली Apple आगामी काही दिवसात स्मार्टफोन्सला लाँच करणार आहे. त्यासाठी कंपनीने जोरदार तयारी केली आहे. आयफोन १३ सीरीजला यावर्षी लाँच करण्यात येणार आहे. Launch Date संबंधी डिटेल समोर आले आहेत. परंतु, याला सप्टेंबर २०२१ मध्ये लाँच करण्यात येणार आहे. अॅपलने यावर्षी मोठी तयारी केली आहे. आगामी काळात कंपनी अनेक प्रोडक्ट्स लाँच करणार आहे. ज्यात स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि वायरलेस हेडफोनसह अन्य वस्तूंचा समावेश असणार आहे. वाचाः iPhone 13 चे ४ व्हेरियंट टेक एनालिस्ट Ming-Chi Kuo च्या माहितीनुसार, आयफोन १३ सीरीजच्या स्मार्टफोन्स लाँच करण्यात येतील. ज्यात iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max यासारखे प्रमुख स्मार्टफोन्स असतील. गेल्यावर्षी आयफोन१२ सीरीजच्या स्मार्टफोन्स लाँच नंतर हे सुरु झाले आहे. वाचाः आयफोन १३ नावाने कोणताही स्मार्टफोन लाँच न करता आगामी काळात याला iPhone 12S नावाने मोबाइल लाँच केला जावू शकतो. परंतु, आत्ताच यावर भाष्य करणे थोडे चुकीचे ठरेल. वाचाः तसेच, iPhone 13 Mini चा डिस्प्ले ५.४ इंचाचा असू शकतो. तर iPhone 13 चा ६.१ इंचाचा, iPhone 13 Pro चा सुद्धा ६.१ इंचाचा आणि iPhone 13 Pro Max चा डिस्प्ले ६.७ इंचाचा असू शकतो. याची किंमत iPhone 12 प्रमाणे असू शकते. अॅपलने गेल्यावर्षी आपली फ्लॅगशीप स्मार्टफोन सीरीज आयफोन १२ ला जगभरात लाँच केले होते. या सीरीजमध्ये iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max सारख्या स्मार्टफोन्सचा समावेश होता. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sB5ofl

Comments

clue frame