नवी दिल्लीः Flipkart Big Saving Days सेल मध्ये युजर्संना इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या दरम्यान अनेक ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ज्यात पोको, मोटोरोला, Infinix सह अन्य लोकप्रिय ब्रँड्सचा समावेश आहे. या स्मार्टफोन्सला केवळ फ्लॅट डिस्काउंट्स सोबत नव्हे तर अनेक बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स सोबत खरेदी केले जाऊ शकते. वाचाः फ्लिपकार्ट आपल्या युजर्संना एचडीएफसी क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट देत आहे. या ठिकाणी अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट दिला जात आहे. परंतु, आम्ही या ठिकाणी केवळ इनफिनिक्सच्या स्मार्टफोन्सवर देण्यात येत असलेल्या डिस्काउंटसंबंधी माहिती देत आहोत. तसेच इनफिनिक्स स्मार्ट टीव्ही वर देत असलेल्या डिस्काउंटची माहिती देत आहोत. वाचाः Infinix Note 7: या फोनला १० हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. या फोनला ११ हजार ४९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. तसचे यासोबत १० हार ४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर सुद्धा दिला जात आहे. फ्लॅट डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर मिळून या फोनवर १० हजार ९५० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. तसेच या फोनला नो कॉस्ट ईएमआय वर सुद्धा खरेदी करता येऊ शकते. या फोनमध्ये ६.९५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हा फोन ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी ७० प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा आणि लो लाइट कॅमेरा सेन्सर दिला आहे. तसेच १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः Infinix Zero 8i:या फोनला १४ हजार ९९९ रुपयांत खरेदी केले जाऊ शकते. याआधी या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये होती. यासोबतच १४ हजार ४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. फ्लॅट डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर मिळून या फोनवर १५ हजार ४०० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. तसेच या फोनला नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी केले जाऊ शकते. या फोनमध्ये ६.८५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हा फोन ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी ९० प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम देण्यात आला आहे. १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. १६ मेगापिक्सलचा आणि प्लस ८ मेगापिक्सलचा ड्यूल सेल्फी फ्रंट सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः Infinix Smart TVs: या कंपनीच्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीला ११ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. या टीव्हीला १२ हजार ९९९ रुपयांत लाँच केले होते. तर ४२ इंच स्मार्ट टीव्हीला २० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. ४२ इंच स्मार्ट टीव्हीवर ११ हजारांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तसेच या टीव्हीला नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qCAlxX
Comments
Post a Comment