नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड () ने पुन्हा एकदा आपला १९९९ रुपयांचा वार्षिक प्लान अपडेट केला आहे. डिसेंबर २०२० अखेरमध्ये टेलिकॉम कंपनी OTT सब्सक्रिप्शन मध्ये बदल करण्यात आले होते. आता बीएसएनएलने डेटा बेनिफट कमी केले आहे. बीएसएनएलच्या १९९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळत होता. परंतु, आता १ फेब्रुवारीपासून या प्लानमध्ये केवळ २ जीबी डेटा मिळू शकणार आहे. कंपनीच्या या प्लानला सध्या १ दिवसांची जास्त वैधता मिळते. ही ऑफर ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वैध आहे. वाचाः बीएसएनएलचा १९९९ रुपयांचा वार्षिक प्लान बीएसएनएलच्या या प्लानमध्ये आता ३ जीबी ऐवजी २ जीबी डेटा रोज मिळणार आहे. या प्लानची वैदथा आधी इतकीच ३६५ दिवसांची राहणार आहे. प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, लोकल-एसटीडी कॉलची सुविधा मिळणार आहे. दिल्ली आणि मुंबई एमटीएनएल नेटवर्कवर सुद्धा अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. वाचाः १९९९ रुपयांच्या वार्षिक प्लानला रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आता इरोस नाउचे अनलिमिटेड कॉन्टेंन्टचा फायदा मिळू शकतो. हा फायदा पूर्ण ३६५ दिवसांसाठी असेल. तसेच ६० दिवसांसाठी लोकधून कॉन्टेंट फ्री मिळणार आहे. डिसेंबर २०२० मध्ये रिविजन आधी १९९९ रुपयांच्या प्लानमध्ये लोकधून कॉन्टेंट ३६५ दिवसांसाठी आणि इरोस नाउचे अॅक्सेस ६० दिवसांसाठी मिळत होते. याशिवाय ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड साँग चेंज ऑप्शन सोबत PRBT बेनिफिट मिळत आहे. वाचाः बीएसएनएलने पीव्ही १९९९ साठी मल्टिपल रिचार्जची सुविधा १ फेब्रुवारी पासून परत घेण्याची घोषणा केली आहे. सध्या या प्लानमध्ये कंपनी २१ दिवसांची वैधता ऑफर करीत आहे. म्हणजेच आता १९९९ रुपयांच्या प्लानला रिचार्ज केल्यास ग्राहकांना ३८६ दिवसांची वैधता मिळते. १ फेब्रुवारी पासून रिचार्ज केल्यास ३६५ दिवसांची वैधता मिळणार आहे. युजर्संसाठी २३९९ रुपयांच्या वार्षिक प्लान आहे. या प्लानमध्ये रिपब्लिक डे अंतर्गत ७२ दिवसांसाठी एक्स्ट्रा वैधता ऑफर केली जात आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3clOEDm
Comments
Post a Comment