वोडाफोन-आयडिया ग्राहकांना मिळतोय ५० जीबी बोनस डेटा, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः वोडाफोन आयडिया Vodafone Idea (vi) आपल्या २५९५ रुपयांच्या प्लानमध्ये बोनस डेटा ऑफर करीत आहे. ही ऑफर वोडाफोन आयडियाच्या मोबाइल अॅप द्वारे रिचार्ज करण्यावर मिळणार आहे. कंपनीच्या वेबसाइटवरून रिचार्ज केल्यानंतर बोनस डेटाचा फायदा मिळणार नाही. २५९५ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता १ वर्षाची आहे. कंपनीचा हा सर्वात महाग प्लानपैकी एक प्लान आहे. आता ग्राहकांना या प्लानमध्ये ५० जीबी डेटा ऑफर केला जात आहे. वाचाः २५९५ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ५० जीबी बोनस डेटा २५९५ रुपयांच्या प्लानला मोबाइल अॅपमध्ये 'Extra 50GB' सोबत मेंशन करण्यात आले आहे. हा ५० जीबी डेटा प्लानच्या एक्सपायर पर्यंत वैध राहणार आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. वोडाफोन आयडियाने ही माहिती दिली नाही की हे बेनिफिट किती दिवसांपर्यंत राहिल. परंतु, अपेक्षा करण्यात येत आहे की, ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे. २५९५ रुपयांच्या वोडाफोन आयडिया प्लानमध्ये २ जीबी डेटा एफयूपी लिमिट सोबत मिळतो. याशिवाय, देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळते. ग्राहकांना रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. एक वर्षापर्यंत वोडाफोन युजर्संना झी ५ चे प्रीमियम सब्सक्रिप्शन फ्री मिळते. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. वाचाः या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण ७३० जीबी डेटा मिळतो. बोनस डेटा जोडल्यास एकूण ७८० जीबी डेटाचा फायदा घेता येऊ शकतो. ही ऑफर वोडाफोनच्या वेबसाइटवरून मिळू शकणार नाही. ही एक अॅप एक्सक्लूसिव ऑफर आहे. या प्लानमध्ये Vi Movies & TV Classic चे फ्री अॅक्सेस मिळते. हा प्लान 'Weekend Data Rollover' ऑफर सोबत येतो. या ऑफर सोबत युजर्स एक आठवडा सोमवार ते शुक्रवार पर्यंत वाचवलेल्या डेटाला विकेंड म्हणजेच शनिवारी आणि रविवारी वापरू शकतात. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36gqaHG

Comments

clue frame