टिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार

नवी दिल्लीः चीनी कंपनी बाइटडान्सने भारतातील आपला व्यवसाय बंद करीत असल्याची घोषणा केली आहे. कंपनीने शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकवर भारतात बंदी कायम केल्याने कंपनीने हा निर्णय जाहीर केला आहे. टिकटॉकची ग्लोबल हेड वेनेसा पपास आणि ग्लोबल बिझनेस सोल्यूशन्सचे व्हॉइस प्रेसिडेंट ब्लॅक चेंडली यांनी ईमेल करून कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली आहे. भारतात बंदी आधी टिकटॉकचे २० कोटीहून जास्त युजर्स होते. वाचाः टिकटॉकचे प्रवेक्त्याने सांगितले की, हे सांगताना खूपच दुःख होत आहे. गेल्या सात महिन्यांपासून आम्ही प्रयत्न करीत होतो. परंतु, सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे भारतातील २ हजार कर्मचाऱ्यांना काढण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही. ईमेलमध्ये म्हटले की, भारतात आमचे कधी पुनरागमन होईल, हे माहिती नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावर ठेऊन काहीच अर्थ नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर आता बेरोजगारीची वेळ येणार आहे. कंपनीने या सर्व कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा पगार तसेच कंपनीसोबत काम केल्याचे भेट म्हणून आणखी एक महिना असे चार महिन्यांचा पगार दिला आहे. वाचाः भारतात टिकटॉकवर बंदी असली तर ग्लोबली सर्वात जास्त कमाई भारतातून केली आहे. अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईनंतर २०२० मध्ये जागतिक स्तरांवर सर्वात जास्त कमाई करणारा अॅप बनला आहे. ज्यात कंपनीने ३.९ हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. २०२० मध्ये सर्वात जास्त डाउनलोड करण्यात आलेला टिकटॉक अॅप अॅनालिटिक्स फर्म अॅपटॉपियाच्या आकडेवारीनुसार ८५ कोटी सोबत टिकटॉक २०२० मध्ये जगातील सर्वात जास्त डाउनलोड केला जाणारा अॅप आहे. यानंतर ६० कोटी डाउनलोड सोबत व्हॉट्सअॅप आणि ५४ कोटी डाउनलोड सोबत फेसबुक होते. भारत-चीन यांच्यात गलवान खोऱ्यात चकमक झाल्यानंतर भारत सरकारने २९ जून रोजी टिकटॉक सह ५९ चीनी अॅप्सवर बंदी घातली होती. वााचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Yikjxc

Comments

clue frame