म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान. एक दोन नव्हे, तर तब्बल २२ हजार महिलांना सोशल मीडियावर जाहिराती देऊन फसविणाऱ्या सायबर भामट्याला सायबर पोलिसांनी अटक केली. हा तरुण मूळचा गुजरात येथील असून त्याने परदेशात संगणक क्षेत्रातील शिक्षण घेतले आहे. या भामट्याने सुमारे ७० लाखांचा चुना लावल्याचे आतापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे. वाचाः महिलांचे ड्रेस मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी तसेच गृहपयोगी वस्तूंच्या जाहिराती Shopiiee.com या संकेतस्थळावरून फेसबुक तसेच इतर सोशल मीडियावर देऊन आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी सायबर पोलिसांकडे केल्या होत्या. महिलांची वाढती फसवणूक लक्षात घेऊन सायबर पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षक शर्मिला सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद खोपीकर, सहायक निरीक्षक रविकिरण नाळे, उपनिरीक्षक गणेश कोकाटे यांच्यासह हेमंत ठाकूर, मयूर थोरात, पांचाळ यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक पुरावे जमा केले. यावरून हा प्रकार गुजरातमधून सुरू असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी गुजरातच्या सुरतमधून ३२ वर्षाच्या संगणक तज्ज्ञाला अटक केली. वाचाः या बोगस संकेतस्थळांचा वापर या भामट्याने https://ift.tt/2M3UUEQ, https://ift.tt/3szhLsw, https://ift.tt/3o1yIZj, https://takesaree.com/, https://ift.tt/3sBIoNg, https://ift.tt/3oU6QaC, https://ift.tt/35OyYEE, https://ift.tt/2LFZ4CQ, https://ift.tt/39E9TgE, https://ift.tt/35OpzNj, https://ift.tt/2XSYvYE [kjsnh djrkuk Ql या बोगस संकेतस्थळांचा वापर केल्याचे झाले आहे. वाचाः ही घ्या खबरदारी- ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय निवडा ऑनलाइन शॉपिंगचा सिक्युअर गेटवे निवडावा खरेदीवर मोठी सवलत देणाऱ्यांपासून सावध राहा. वेबसाइटच्या कन्झ्यूमर कम्प्लेट / Ḥरिव्ह्यू ची पाहणी करा. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करा. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3inrxJr
Comments
Post a Comment