‘व्हॉट्सअॅपचे धोरण मंजूर नसेल तर व्हॉट्सअॅप वापरू नका’

वृत्तसंस्था, नवी दिल्ली ‘व्हॉट्सअॅपचे नवीन गोपनीयता धोरण स्वीकारणे ही ऐच्छिक बाब असून, या धोरणाच्या अटी व शर्तींशी सहमत नसल्यास व्हॉट्सअॅपचा वापर न करण्याचा पर्याय वापरकर्त्यांकडे आहे. त्यामुळे धोरण मंजूर नसेल तर वापरू नका,’ असा सल्ला दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. वाचाः व्हॉट्सअॅपच्या नवीन गोपनीयता धोरणाला आव्हान देणारी याचिका एका वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्या. संजीव सचदेवा याचिकाकर्त्याला म्हणाले, ‘हे खासगी अॅप आहे. धोरण मंजूर नसेल तर ते वापरू नका. धोरण स्वीकारणे ऐच्छिक आहे, ते स्वीकारू नका. दुसरे कोणते तरी अॅप वापरा.’ न्यायालयाने असेही म्हटले आहे की, बऱ्याच मोबाइल अ‍ॅप्सच्या अटी व शर्ती वाचल्यास, आपण कशास संमती देत आहात याबद्दल आश्चर्य वाटेल. अगदी गुगल मॅप देखील आपली सर्व माहिती संग्रहित करून ठेवते. वाचाः व्हॉट्सअॅपचे नवीन गोपनीयता धोरण ८ फेब्रुवारी, २०२१पासून लागू होणार आहे. हे धोरण अमान्य केल्यास यूजर ‘व्हॉट्सअॅप’ अकाउंटचा वापर करू शकणार नाहीत, असे व्हॉट्सअॅपने जाहीर केले होते. मात्र वापरकर्त्यांच्या नाराजीनंतर हे धोरण मे महिन्यापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. वाचाः याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, नवीन गोपनीयता धोरणानुसार घटनेअंतर्गत वापरकर्त्याच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. नवीन धोरण व्हॉट्सअ‍ॅपला सरकारच्या देखरेखीशिवाय वापरकर्त्याच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटीमध्ये थेट ढवळाढवळ करू देणार असल्याचा दावा देखील याचिकेत केला आहे. नवीन धोरणांतर्गत, वापरकर्ते एकतर ते स्वीकारू शकतात किंवा अ‍ॅपमधून बाहेर पडू शकतात. परंतु फेसबुकच्या मालकीच्या किंवा तृतीय पक्षाच्या अ‍ॅप्ससोबत आपली माहिती सामायिक करू न देण्याचा अधिकार वापरकर्त्याला नाही, याकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. वाचाः सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले आहे की, याचिकाकर्त्याने म्हटल्याप्रमाणे वापरकर्त्याची नेमकी कोणती माहिती लीक होईल हे समजू शकत नाही. त्यामुळे या मुद्द्यावर विचार करणे आवश्यक असल्याने त्यावर २५ जानेवारी रोजी सुनावणी होईल. या प्रकरणी विश्लेषण करण्याची गरज असल्याच्या न्यायालयाच्या मताशी केंद्र सरकारनेही सहमती दर्शविली. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bM2C14

Comments

clue frame