व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीनंतर सिग्नल, टेलिग्रामचे युजर वाढले

‌वृत्तसंस्था, ओकलँड व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी केलेल्या प्रायव्हसी बदलांमुळे अनेक वापरकर्ते आता इतर पर्यायांकडे वळू लागल्याचे दिसून येत आहेत. व्हॉट्सअॅपसारखेच एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप असणारी ‘सिग्नल’आणि ‘टेलिग्राम’ ही अॅप मात्र, अॅपल आणि गुगलच्या अॅप स्टोरवरून मोठ्याप्रणात डाऊनलोड झाल्याचे दिसून येत आहे. याउलट फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपच्या वाढीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. वाचाः मोबाइल अ‍ॅप ‘अॅनालिटिक्स फर्म सेन्सर टॉवर’ने बुधवारी सांगितले की, ५ ते १२ जानेवारी या आठवडाभरात ‘सिग्नल’ने अॅपल आणि गुगलवर १७.८ दशलक्ष अॅप डाउनलोडची नोंद केली. गेल्या आठवड्यात याची केवळ २ लाख ८५ हजारांनी ६१ पट वाढ झाली. टेलिग्राम मेसेजिंग अॅप हे जगभरातील वापरकर्त्यांमध्ये आधीपासूनच लोकप्रिय असून, ५ ते १२ जानेवारी या कालावधीत या अॅपने १५.७ दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा गाठला आहे. मागील आठवड्यातील ७.६ दशलक्ष डाऊनलोड्सच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. याउलट व्हॉट्सअ‍ॅपचे डाऊनलोड या काळात घटले असून, ते १०.६ दशलक्ष इतके राहिले आहे. त्या आधीच्या आठवड्यात मात्र ते १२.७ दशलक्ष होते. वाचाः आशियात टेलिग्राम ५० कोटींच्या पुढे व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरण्याच्या पार्श्वभूमीवर वापरकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांनी आपला मोर्चा टेलिग्रामकडे वळवला आहे. यामुळे आशियामध्ये टेलिग्रामच्या सब्सक्राइबरची संख्या ५० कोटींच्या पुढे गेली आहे. ‘गेल्या ७२ तासांमध्ये आपले अडीच कोटी वापरकर्ते वाढले आहेत,’अशी माहिती टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांनी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ifGjSr

Comments

clue frame