ओप्पोच्या 'या' फोनवर ३५०० रुपयांचा डिस्काउंट, 'हे' दोन फोनही स्वस्त

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी ओप्पो ने काही दिवसांपूर्वी आपला ५जी स्मार्टफोन लाँच केला होता. भारतीय मार्केटमध्ये या फोनला ३५ हजार ९९० रुपयांत लाँच केले होते. परंतु, आता या फोनवर ३५०० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. हा डिस्काउंट ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या मोबाइल बोनान्झा Mobile Bonanza सेल वर दिला जात आहे. याशिवाय अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. 5G शिवाय, Moto G 5G आणि iQOO 3 (5G) स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात खरेदी करता येऊ शकते. वाचाः Oppo Reno 5 Pro 5G फोनवरील ऑफर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३५ हजार रुपये आहे. यासोबत अनेक ऑफर्स दिले जात आहे. जर युजर्संना आयसीआयसीआय बँक कार्ड्सचा वापर केल्यास त्यांना ३५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआयवर १२ महिन्यांपर्यंत ईएमआयवर फोन खरेदी करता येऊ शकतो. वाचाः १ रुपयात कम्प्लिट मोबाइल प्रोटेक्शन ऑफर दिली जात आहे. फोनसोबत गॅरंटी दिली जात आहे. १२ महिन्यासाठी १२० जीबी क्लाउड स्टोरेज दिली जात आहे. या फोनसोबत १६ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. वाचाः Moto G 5G वर ही ऑफर या फोनच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटला ६ हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत २४ हजार ९९९ रुपयांऐवजी १८ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. तर आयसीआयसीआय बँक कार्ड्सचा वापर केल्यास १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेटिड कार्ड द्वारे ५ टक्के अनिलिमिटेड कॅशबॅक दिला जात आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येऊ शकते. या फोनवर १६ हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. वाचाः iQOO 3 (5G) वर ही ऑफर या फोनच्या १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ४६ हजार ९९० रुपये आहे. १२ हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत हा फोन ३४ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकतात. आयसीआयसीआय बँक कार्ड्सचा वापर केल्यास १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड द्वारे ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक दिला जात आहे. नो कॉस्ट ईएमआय वर फोन खरेदी करू शकता. फोनसोबत १६ हजार ५०० रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qYsqvo

Comments

clue frame