नवी दिल्लीः एअरटेलने नोव्हेंबर २०२० मध्ये ४३ लाख नवीन मोबाइल जोडले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया () च्या लेटेस्ट डेटा वरून ही माहिती उघड झाली आहे. टेलिकॉम ऑपरेटरने नवीन सब्सक्राइबर्समध्ये जिओवर मात करीत नंबर वन स्थान पटकावले आहे. वोडाफोन आयडिया आणि सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलने नोव्हेंबर महिन्यात आपला ग्राहक गमावले आहेत. लागोपाठ चौथ्या महिन्यात एअरटेलने मोबाइल सब्सक्राइबर्स मध्ये पहिले स्थान पटकावले आहे. वाचाः ट्रायकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबर २०२० च्या डेटावरून एअरटेलने नोव्हेंबर मध्ये ४.३ मिलियन (४३ लाख) मोबाइल सब्सक्राइबर जोडले आहेत. आता एअरटेलकडे एकूण ३३४.६५ मिलियन सब्सक्राइबर्स झाले आहेत. मार्केटमध्ये भागीदारी २८.९७ टक्के झाली आहे. ऑक्टोबर २०२० च्या डेटाशी तुलना केल्यास कंपनीने १.३ टक्के ग्रोथ नोंद केली आहे. वाचाः रिलायन्स जिओने नोव्हेंबर मध्ये १.३ मिलियन (जवळपास १३ लाख) मोबाइल सब्सक्राइबर्स जोडले आहेत. ऑक्टोबर २०२० च्या तुलनेत कंपनीने ०.४८ टक्के ग्रोथची नोंद केली आहे. जिओकडे एकूण ४०८.२९ मिलियन वायरलेस सब्सक्राइबर्स आहेत. कंपनीचे मार्केट शेयर ३५.३४ टक्के आहे. तर बीएसएनएल टेलिकॉम कंपनीने १८.३५७ ग्राहक तर वोडाफोन आयडियाने २.८९ मिलियन सब्सक्रायबर्स नोव्हेंबर २०२० मध्ये गमावले आहेत. २०२० पर्यंत बीएसएनएलकडे ११८.८६ मिलियन ग्राहक होते. तसेच कंपनीचे मार्केट शेयर १०.३ टक्के राहिले आहेत. वोडाफोन आयडियाकडे २५.१ टक्के मार्केट शेयर सोबत २८९.९४ मिलियन सब्सक्राइबर्स होते. वाचाः ट्रायने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर २०२० च्या अखेरपर्यंत १,१५१,८१ मिलियन वायरलेस सब्सक्रायबर्स वाढले आहेत. याशिवाय एअरटेलकडे सर्वात जास्त अॅक्टिव वायरलेस सब्सक्रायबर्स ९६.६३ टक्के राहिले आहे. अॅक्टिव वायरलेस सब्सक्राइबर्स जिओकडे ७९.५५ टक्के, वोडाफोन आयडियाकडे ८९.०१ टक्के आणि बीएसएनएलकडे ५१.७२ टक्के मार्केट शेयर आहे. एकूण जिओकडे सर्वात जास्त ५५.२७ टक्के मार्केट शेयर आहे. एअरटेलकडे २३.५१ टक्के, वोडाफोन आयडियाकडे १६.५१ टक्के आणि बीएसएनएलकडे ३.५२ टक्के मार्केट शेर नोव्हेंबर २०२० मध्ये राहिले आहे. वाचाः वााचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cnrdtk
Comments
Post a Comment