संभ्रम वाढला! बच्च्चन यांच्या कॉलर ट्यून संबंधी दूरसंचार मंत्रालयाचे मोठे विधान

Prasad.Panse@timesgroup.com Tweet : @prasadpanseMT पुणे : 'कोव्हिड १९ अभी खत्म नहीं हुआ है... इसलिए जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं', महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सर्वांना ही चिरपरिचित आपल्यापैकी जणू पाठ झाली आहे. या संदर्भात बच्चन यांच्याशी केलेला करार किंवा यापोटी मोजलेली रक्कम याबाबत काहीही माहिती नसल्याची धक्कादायक माहिती दूरसंचार मंत्रालयानेच दिली आहे. करोनासंदर्भातील आरोग्य सेतू अॅपनंतर आता या कॉलर ट्यूनबद्दलही माहिती उपलब्ध नसल्याचा खुलासा केंद्रीय मंत्रालयाने केल्याने या संदर्भातील संभ्रम वाढला आहे. वाचाः अॅड. प्रणय अजमेरा यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जाला उत्तर देताना दूरसंचार मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. बच्चन यांच्या आवाजातील या कॉलर ट्यूनसाठी बच्चन यांच्यासोबत करण्यात आलेल्या कराराचा तपशील अजमेरा यांनी मागितला होता. त्याचबरोबर या कॉलर ट्यूनच्या रेकॉर्डिंगसाठी बच्चन यांना किती मानधन देण्यात आली, याचीही विचारणा अजमेरा यांनी केली होती. मात्र, याबाबत कोणताही तपशील उपलब्ध नसल्याची माहिती दूरसंचार मंत्रालयाने दिली. वाचाः सुमारे तीस सेकंदांची ही कॉलर ट्यून प्रत्येक कॉलच्या आधी ऐकवली जात होती. अनलॉकनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरू झाल्यानंतरही ही कॉलर ट्यून ऐकवली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या कॉलर ट्यूनमुळे नागरिकांचा वेळ वाया जात असल्याची टीकाही केली जात होती. त्यामुळेच ही कॉलरट्यून बंद करावी, यासाठी सोशल मीडियावरून मोहिमदेखील चालवली गेली. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. ही कॉलर ट्यून बंद करावी, या मागणीसाठी एकाने जनहित याचिकादेखील दाखल केली होती. मात्र, ती फेटाळली गेली. वाचाः करोना लसीकरण सुरू झाल्याबरोबरच बच्चन यांच्या आवाजातील ही ट्यून आता बंद करण्यात आली आहे. त्या जागी जसलीन भल्ला यांच्या आवाजातील लसीकरणासंदर्भात माहिती देणारी आणि करोनाचे संकट कायम असल्याने या संदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन करणारी ट्यून ऐकवली जात आहे. करोनाच्या मुकाबल्यासाठी लॉकडाउन लागू करतानाच सरकारने आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करणे सक्तीचे केले होते. मात्र, या अॅपद्वारे व्यक्तिगत माहितीला धोका पोहोचत असल्याची टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सौरव दास यांनी माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाच्या उत्तरात हे अॅप कोणी विकसित केले, याची माहिती नसल्याचे एनआयसी आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले होते. त्यापाठोपाठ आता करोना संदर्भातील सक्तीने ऐकवल्या जाणाऱ्या या कॉलर ट्यूनची माहितीही उपलब्ध नसल्याचे मंत्रालयानेच स्पष्ट केल्याने संभ्रमात भरच पडली आहे. वाचाः प्रत्येक कॉलपूर्वी ही कॉलर ट्यून ऐकावी लागत होती. त्यात भरपूर वेळ वाया जायचा. म्हणून मी या संदर्भातील तपशील माहिती अधिकारात मागवला. देशभर सर्वांना ही कॉलर ट्यून सक्तीने ऐकवल्यानंतरही दूरसंचार मंत्रालयाकडे याची माहिती नसणे धक्कादायक आहे. अॅड. प्रणय अजमेरा, अर्जदार वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pfW5Q6

Comments

clue frame