'गुड न्यूज', आता मोबाइलमध्ये डाउनलोड करा 'मतदान कार्ड'

नवी दिल्लीः how to download : डिजिटल इंडियात आता एक एक पाऊल पुढे टाकले जात आहे. मतदान ओळख पत्र (वोटर कार्ड) ला आता मोबाइल फोन किंवा कम्प्यूटरवर डाउनलोड करू शकता येते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ई-इलेक्ट्रिक फोटोचे आता डिजिटल लॉकर सारख्या माध्यमाप्रमाणे सुरक्षित ठेवले जाऊ शकते. तसेच याला पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉर्मेटमध्ये (पीडीएफ) मुद्रित केले जाऊ शकते. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स डिजिटल मोडमध्ये उपलब्ध आहेत. आता सुद्धा डिजिटल मोड मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. वाचाः मोबाइलमध्ये वोटर कार्ड डाउनलोड करण्याची ही सुविधा दोन टप्प्यात मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच २५ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान केवळ नवीन मतदारांनी ही डिजिटल वोटर कार्ड डाउनलोड करता येऊ शकणार आहे. परंतु, यासाठी त्यांचा मोबाइल नंबर निवडणूक आयोगासोबत नोंदणीकृत असायला हवा. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच १ फेब्रुवारी पासून सर्व वोटर्स आपल्या वोटर आयडी कार्डला डिजिटल रुपात डाउनलोड करू शकतात. यासाठी सुद्धा मोबाइल नंबर निवडणूक आयोगाच्या वेबसाइट सोबत रजिस्टर असायला हवा. हे काम तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन करू शकतात. वाचाः वोटर कार्डची डिजिटल कॉपीला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीचा वापर करू शकतात. पहिला म्हणजे मोबाइल अॅप (Voter Helpline) आणि दुसरा म्हणजे निवडणूक आयोगाची वेबसाइटवरून करू शकतात. जर तुमच्या फोनमध्ये अॅप नसेल तर तो अॅप डाउनलोड करावा लागेल किंवा आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन तुमचा मोबाइल नंबर ई-मेल आयडीवरून लॉग इन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Download e-EPIC हा पर्याय दिसेल. त्यानंतर मोबाइल नंबर किंवा वोटर कार्ड नंबर टाकून तुम्ही पीडीएफ मध्ये आपले मतदान ओळखपत्र (वोटर कार्ड) डाउनलोड करू शकता. पीडीएफ फाइलमध्ये एक क्यूआर कोड दिसेल. त्याला स्कॅन केल्यानंतर पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसेल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3a4vxLl

Comments

clue frame