न्यू प्रायव्हसी पॉलिसीः व्हॉट्सअॅपचे 'हे' चार स्टेट्स पाहिले का?

नवी दिल्लीः WhatsApp ने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीला जोरदार विरोध झाल्यानंतर कंपनीने थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे. युजर्संना या पॉलिसीसंबंधी अधिक माहिती मिळावी यासाठी कंपनीने चार स्टेट्स ठेवले आहे. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या सर्व युजर्संना हे व्हॉट्सअॅप आता दिसत आहे. व्हॉट्सअॅपने वृत्तमानपत्रात सुद्धा फुल पेज जाहिरात दिली आहे. कंपनी सर्व तऱ्हेने आपली पॉलिसी युजर्संना सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. वाचाः या स्टेट्समध्ये कंपनीने म्हटले आहे की, कंपनी तुमचे पर्सनल मेसेज वाचत नाही. किंवा ऐकत नाही. कारण, हे एंड टू एंड इनक्रिप्टेड आहे. ऑफिशल स्टेट्स पोस्ट असणे हे युजर्संसाठी आश्चर्यचकीत करण्यासारखे आहे. एकदा या पोस्टवर क्लिक केल्यानंतर युजर्सच्या स्टेट्स फीड हून हे गायब होतात. तसेच viewed Updates मध्ये सुद्धा हे स्टेट्स दिसत नाहीत. त्यामुळे असे वाटत आहे की, जगभरातील युजर्संसाठी हे स्टेट्स पोस्ट केले आहेत. नवीन प्रायव्हसी पॉलिसीनंतर जगभरातून कंपनीवर टीका केली जात आहे. नवीन पॉलिसी अपडेट न केल्यास युजर्संचे अकाउंट ८ फेब्रुवारी पासून डिलीट करणार असल्याचे कंपनीने आधी म्हटले होते. परंतु, लोकांचा संताप पाहिल्यानंतर कंपनीने थोडी नरमाईची भूमिका घेत तूर्तास ते मागे घेण्यात आले आहे. वाचाः नवीन पॉलिसीनंतर खूप साऱ्या युजर्संनी दुसऱ्या अॅप्सकडे सिग्नल आणि टेलिग्रामवर स्विच केले आहे. व्हॉट्सअॅपची नवीन पॉलिसी आल्यानंतर या प्रायव्हेट प्रायव्हसी फोकस अॅप्सचे डाउनलोड मध्ये वेग आला होता. व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉग मध्ये म्हटले की, आम्ही त्या तारखेला पुढे करीत आहोत. कोणत्याही युजर्सचे अकाउंट ८ फेब्रुवारी रोजी डिलीट किंवा सस्पेंड होणार नाही. चुकीची माहिती पसरल्याने तिचे स्पष्टीकरण देण्याचा आम्ही आमच्याकडून प्रयत्न करीत आहोत. आम्ही १५ मे ला नवीन बिजनेस ऑप्शन उपलब्ध करण्याआधी हळूहळू आपल्या पॉलिसीला रिव्ह्यू करण्यास सांगणार आहोत. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LXCNjG

Comments

clue frame