Apple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'

नवी दिल्लीः Apple Store ने भारतात आपल्या ग्राहकांसाठी ५ हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरचा फायदा त्याच ग्राहकांना मिळणार जे ग्राहक ४४ हजार ९०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे ऑनलाइन खरेदी करतील. ही मर्यादित वेळेसाठी ऑफर आहे. याची सुरुवात २१ जानेवारी पासून सुरू होणार असून २८ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. तसेच ही ऑफर HDFC Bank क्रेडिट कार्ड आणि HDFC क्रेडिट कार्ड EMIs साठी वैध असणार आहे. वााचाः ऑफर चे नोटिफिकेशन Apple Store India च्या वेबपेजवर सर्वात वरच्या बाजुला पाहू शकता. यात लिहिले आहे की, कॅशबॅक ऑफरची सुरुवात २१ जानेवारी पासून सुरू होत आहे. ज्यात ४४ हजार ९०० रुपये आणि त्याहून जास्त किंमतीचे प्रोडक्ट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय पर्याय मिळणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कॅशबॅक ऑफर HDFC Bank क्रेडिट कार्ड आणि HDFC क्रेडिट कार्ड ईएमआयवर वैध आहे. याशिवाय, या ऑफरला एज्यूकेशनसाठी अॅपल स्टोरच्या कमी किंमतीसोबत जोडण्यात आले नाही. वाचाः ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला सिंगल ४४,९०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचे प्रोडक्ट ऑफर प्लेस करावे लागेल. अनेक ऑर्डरवर तुम्ही ५ हजारांची कॅशबॅक ऑफर मिळवू शकत नाही. जर तुमचे ऑर्डर व कार्ड या ऑफर योग्य असेल तर प्रोडक्ट डिलिवरीच्या ७ दिवसांच्या आत तुम्हाला तुमची कॅशबॅक मिळू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39DlVGZ

Comments

clue frame