Xiaomi ने लाँच केली नवी Mi11 सीरीज, 108MP कॅमेऱ्यासोबत हे खास फीचर्स

नवी दिल्लीः शाओमीने २०२० हे वर्ष संपण्याआधी आपल्या स्मार्टफोनच्या यादीत आणखी एक नवीन मॉडल जोडले आहे. कंपनीने आपली नवीन सीरीज लाँच केली आहे. ही सीरीज खूपच आकर्षक आणि ५ जी इनेबल्ड क्वॉलकॉम स्नॅपड्र्रॅगन चिपसेट सोबत कंपनीने याला चीनच्या बाजारात उतरवले आहे. स्मार्टफोन सोबत चार्जर न देण्याचा हा शाओमीचा पहिला फोन आहे. वाचाः च्या स्मार्टफोनमध्ये ६.८१ इंचाचा अमोलेड पॅनेल दिला आहे. यात स्नॅपड्रॅगन ८८८ एसओसी चिपसेट दिला आहे. कंपनीने यात 4,600mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ५५ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. तसेच ५० वॉटची वायरलेस चार्जिंग आणि १० वॉटचे रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Harman Kardon चा दमदार स्टीरियो स्पीकर दिला आहे. याशिवाय फिंगर सेन्सर सुद्धा दिला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः Mi 11 कंपनीचा पहिला फोन आहे. जो MIUI 12.5 अँड्रॉयड ११ वर बेस्ड आहे. या स्मार्टफोनमध्ये एक खास ब्लूटूथ ऑडियो शेयरिंग फीचर दिले आहे. याच्या मदतीने एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ब्लूटूथ अॅक्सेसरीजला ऑडियो शेयर करू शकता येतील. सध्या या फोनला चीनच्या बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. वाचाः या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या तीन व्हेरियंट्स मध्ये लाँच केले आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३९९९ चिनी युआन, ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनला ४२९९ चिनी युआन आणि १२ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेजच्या फोनला ४६९९ चिनी युआन किंमतीत लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टफोनसोबत कंपनी चार्जर देत नाही. त्यामुळे ग्राहकांना वेगळे चार्जर खरेदी करावे लागणार आहे. याची किंमत ३९९ युआन ठेवण्यात आली आहे. हा फोन १ जानेवारी पासून चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34R2yJ4

Comments

clue frame