Vivo X60 Series लाँचआधीच ऑफिशल स्टोरवर लिस्ट, डिझाइन व कलर उघड

नवी दिल्लीः च्या आणि हँडसेट्सला लाँच आधीच कंपनीने ऑनलाइन स्टोरवर लिस्ट केले आहे. या लिस्टिंगमधून दोन्ही स्मार्टफोन्सच्या कलर व्हेरियंट्स आणि रॅम व स्टोरेजची माहिती उघड झाली आहे. आता हँडसेट्सच्या किंमतीची माहिती उघड करण्यात आली नाही परंतु, ५ एनएम फ्लॅगशीप चिपसेटचा खुलासा झाला आहे. तसेच विवोने आधीच सांगितले आहे की, विवो एक्स ६० सीरीजमध्ये सर्वात आधी नवीन OriginOS दिला जाणार आहे. वाचाः विवो एक्स ६० सीरीजमध्ये एक प्रो आणि एक नॉन प्रो व्हेरियंट असणार आहे. विवो एक्स ६० मध्ये फ्लॅट डिस्प्ले असणार आहे. ज्यावर एक सेल्फी कॅमेरा साठी एक होल पंच कटआउट राहणार आहे. हँडसेटमध्ये बेजल लेस डिस्प्ले आहे. फोनमध्ये उजच्या बाजुला व्हॅल्यूम आणि पॉवर बटन दिले जाणार आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत येतो. फोनला ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. विवो एक्स ६० ग्रे, शिमर आणि एक ब्लूइश पिंक ग्रेडियंड कलरमध्ये मिळणार आहे. वाचाः विवो स्टोरे लिस्टिंगच्या माहितीनुसार, Vivo X60 Pro मध्ये एक कर्व्ड डिस्प्ले असणार आहे. तर वरच्या बाजुला व खालच्या बाजुला स्लिम बेजल दिले जाणार आहे. प्रो व्हेरियंटला ग्रे आणि ब्लूइश पिंक ग्रेडियंट कलरमध्ये उपलब्ध केले जाणार आहे. फोनला १२ जीबी रॅम सोबत २५६ जीबी स्टोरेज मध्ये लाँच केले जाणार आहे. हँडसेटमध्ये रियरवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. वाचाः याआधी विवोने चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट विबोवर याची माहिती दिली होती. नोव्हेंबर मध्ये लाँच करण्यात आलेल्या नवीन OriginOS ला सर्वात आधी विवो एक्स ६० सीरीजसोबत आणले जाणार आहे. विवोने एक्स ६० सीरीजमध्ये सॅमसंग एक्सीनॉस १०८० प्रोसेसर मिळणार असल्याचे सांगितले होते. या स्मार्टफोन्सला २९ डिसेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. यात अल्ट्रा स्टेबल मायक्रो हेड कॅमेरा सेन्सर असणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h3SVeM

Comments

clue frame