Vi ची जबरदस्त नवी ऑफर, 'या' युजर्संना मिळणार फायदा

नवी दिल्लीः Vi () ऑनलाइन प्रीपेड सिम डिलिव्हरी सर्विसचा विस्तार केला जात आहे. विस्तारासोबतच आता वोडाफोन आयडियाकडून कंपनीची वेबसाइट वरून सिम ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ३९९ रुपयांचे एक नवीन 'डिजिटल एक्सक्लूसिव' प्रीपेड प्लान ऑफर केले जात आहे. वाचाः वाचाः जे ग्राहक नवीन Vi सिम कार्ड कंपनीच्या ऑफलाइन स्टोरवरून खरेदी करतील त्यांना ३९९ रुपयांचा फायदा मिळणार नाही. त्यांच्याकडे ९७ रुपये, १९७ रुपये, ४९७ रुपये आणि ६४७ रुपयांचे FRC प्लान्स चे ऑप्शन असणार आहेत. Vi चा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान सध्याच्या ग्राहकांसाठी आधी पासूनच उपलब्ध आहे. या प्लानमध्ये रोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि रोज 100SMS सोबत येतो. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. वाचाः वाचाः नवीन ३९९ रुपयांच्या FRC प्लान चा फायदा केवळ त्याच ग्राहकांना मिळणार आहे. जे नवीन Vi कनेक्शन कंपनीच्या वेबसाइटवरून बुक करतील. त्यामुळे वोडाफोन - आयडियाच्या या प्लानला डिजिटल एक्सक्लूसिव म्हटले जावू शकते. कंपनीच्या ३९९ रुपयांच्या प्लान शिवाय नवीन कनेक्शन ऑनलाइन बुक करणाऱ्या ग्राहकांना २९७ रुपयांचा प्लान ऑफर केला जात आहे. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जात आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. तसेच वोडाफोन-आयडिया देशभरात जास्त लोकेशन्समध्ये डिलिवर केला जात आहे. आधी Vi सिम कार्ड डिलिवरी सर्विस केवळ तेलंगानात उपलब्ध नव्हती. परंतु, आता त्या ठिकाणी सुद्धा डिलिवरी उपलब्ध करण्यात आली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h3gCnB

Comments

clue frame