Samsung Galaxy S21 सीरीजचे सर्व स्पेसिफिकेशन लीक, फोनमध्ये हे फीचर्स असणार

नवी दिल्लीः पुढील महिन्यात १४ तारखेला लाँच होणार आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या सीरीजला लाँच होण्यास अजून काही दिवस बाकी आहेत. परंतु, यासंबंधितील लीक्स लागोपाठ समोर येत आहेत. नुकतेच Winfuture.de ने या सीरीजच्या टॉप एंड स्मार्टफोन गॅलेक्सी S20 अल्ट्राचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ल डीटेलला लीक केले होते. आता या पब्लिकेशनने या सीरीजच्या गॅलेक्सी S21 आणि S21 प्लस ला लीक केले आहे. वाचाः गॅलेक्सी S21 आणि S21 प्लस मध्ये मिळू शकते हे स्पेसिफिकेशन सॅमसंगच्या या दोन अपकमिंग स्मार्टफोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. डिस्प्ले 60Hz ते 120Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येवू शकतो. गॅलेक्सी एस २१ च्या डिस्प्लेची साइज ६.२ इंच आणि याच्या प्लस व्हेरियंटच्या डिस्प्लेची साईज ६.७ इंचाचे आहे. दोन्ही स्मार्टफोनची डिस्प्ले क्वॉलिटी डायनामिक अमोलेड २ एक्स आहे. वाचाः गोरिला ग्लास प्रोटेक्शन सोबत येणाऱ्या या फोनमध्ये अल्ट्रा सोनिक इन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. गॅलेक्सी एस २१ मध्ये प्लास्टिक रियर आणि S21+ मध्ये ग्लास पॅनेल मिळणार आहे. गॅलेक्सी S21 मध्ये कंपनी 4000mAh ची बॅटरी दिली आहे. तर S21 प्लस मध्ये 4,800mAh ची बॅटरी दिली आहे. दोन्ही डिव्हाइस मध्ये २५ वॉटची फास्ट चार्जिंग सोबत येतील. वाचाः स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड ११ वर बेस्ड OneUI 3.1 मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ६४ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि एक १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळू शकतो. सेल्फीसाठी या दोन्ही फोनमध्ये १० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. वाचाः दोन्ही स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी आणि २५६ जीबीचे इंटरनल स्टोरेज ऑप्शन मिळू शकतो. युरोपमध्ये कंपनी या दोन्ही फोनला Exynos 2100 चिपसेट सोबत लाँच करू शकते. अमेरिका आणि भारत सह दुसऱ्या मार्केटमध्ये हा फोन स्नॅपड्रॅगन ८८८ सोबत येवू शकतो. युरोपमध्ये गॅलेक्सी एस २१ ची सुरुवातीची किंमत ८४९ युरो जवळपास असू शकते. तर एस २१ प्लसला कंपनी १०४९ युरोच्या किंमतीत लाँच करू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mPPYjl

Comments

clue frame