नवी दिल्लीः Reliance Jio कडे बजेट कॅटेगरीतील प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. जिओकडे १५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत १२९ रुपये आणि १४९ रुपयांचे रिचार्ज पॅक आहेत. याशिवाय, या कॅटेगरीत कंपनी ४ जी डेटा वाउचर सुद्धा ऑफर करते. कंपनी १४९ रुपयांत रोज १ जीबी डेटा ऑफर करतो. जाणून घ्या १२९ रुपये आणि १४९ रुपयांत मिळणाऱ्या खास सुविधासंबंधी. वाचाः १२९ रुपयांत जिओ प्रीपेड पॅक जिओचा १२९ रुपयांचा प्रीपेड पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. या पॅकमध्ये एकूण २ जीबी डेटा ऑफर केला जातो. २ जीबी संपल्यानंतर याची स्पीड कमी होवून 64Kbps राहते. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी 1000FUP वॉइस कॉलिंग मिनट्स मिळते. ग्राहकांना एकूण ३०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन या रिचार्ज पॅकमध्ये फ्री दिले जाते. वाचाः १४९ रुपयांचा जिओ प्रीपेड पॅक जिओचा १४९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज पॅकमध्ये वैधता सोबत २४ दिवसांची आहे. या प्रीपेड प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणाऱ्या डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps होते. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी 300 FUP मिनट्स मिळते. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा या रिचार्ज पॅकमध्ये फ्री मिळते. वाचाः १०१ रुपयांचा ४जी डेटा वाउचर जिओकडे ४जी डेटा वाउचर सुद्धा आहे. या प्लानसोबत रिचार्ज केले जावू शकतो. याची किंमत अनुक्रमे ११ रुपये, २१ रुपये, ५१ रुपये आणि १०१ रुपये आहे. या डेटा वाउचरमध्ये अनुक्रमे 800Mbp डेटा, 2GB डेटा, 6GB डेटा आणि 12GB डेटा ऑफर केला जावू शकतो. याशिवाय व्हाइस कॉलिंग मिनिट्स सुद्धा या डेटा व्हाउचरमध्ये मिळतो. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WRk0IX
Comments
Post a Comment